वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय महिला संघाने सलग तीन सामने गमावल्याने उपांत्य फेरीची वाट बिकट झाली आहे. त्यामुळे उर्वरित दोन्ही सामन्यात काहीही करून विजय मिळवणं भाग आहे. त्यात भारत आणि न्यूझीलंड हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामन्यात विजय मिळवला तर भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा वाढणार आहे. अन्यथा भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग खूपच कठीण होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यात भारताने जबरदस्त फलंदाजी केली. भारताने 48 षटकात 2 गडी गमवून 329 धावा केल्या. पण या सामन्यातील दोन षटकं शिल्लक असताना पाऊस आला. त्यामुळे हा सामना 49 षटकांचा करण्यात आला. डकवर्थ लुईस नियमानुसार खेळण्यास न्यूझीलंडच्या कर्णधाराने नकार दिला. त्यामुळे भारतीय संघाला एक षटक खेळण्यास यावं लागलं. भारताने शेवटच्या षटकात 1 गडी गमवून 11 धावा काढल्या. यासह भारताने 49 षटकात 3 गडी गमवून 340 धावा केल्या आणि विजयासाठी 341 धावांचं आव्हान दिलं. आता भारतीय गोलंदाजांपुढे विजयी धावा रोखण्याचं आव्हान आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने 3331 धावा केल्या होत्या. मात्र भारतीय गोलंदाजांना काही या धावा रोखता आल्या नव्हत्या.
नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याची वेळ आली. पण भारताच्या सलामीच्या जोडीने दमदार ओपनिंग करून दिली. स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांनी 212 धावांची विक्रम भागीदारी केली. स्मृती मंधानाने 95 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकार मारत 109 धावा केल्या. स्मृती बाद झाल्यानंतर प्रतिका रावलने मोर्चा सांभाळला. प्रतिकाने 134 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकार मारत 122 धावांची खेळी केली. या दोघींच्या खेळीमुळे भारताला 300 पार धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सने जबरदस्त खेळी केली. त्यामुळे भारताच्या धावांमध्ये योगदान पडलं. जेमिमा रॉड्रिग्सने 55 चेंडूत 76 धावांची खेळी केली.
भारताने न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकला तरी उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार नाही. भारताला काहीही करून बांगलादेशला पराभूत करावं लागेलं. भारताने न्यूझीलंडसह बांगलादेशला पराभूत केलं तर उपांत्य फेरीत जागा मिळेल. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विजय आणि बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला तर न्यूझीलंड इंग्लंड सामन्यावर सर्व काही अवलंबून असणार आहे. या सामन्यात काहीही करून इंग्लंडला जिंकावे लागेल. त्यानंतर नेट रनरेट खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. कारण दोन्ही संघांचे 6 गुण होतील. अशा स्थितीत नेट रनरेटच्या आधारावर सर्वकाही ठरेल. तर श्रीलंकेचा शेवटच्या सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यात पाकिस्तान जिंकला. तर श्रीलंकेचा पत्ता कट होईल. पण हा सामना श्रीलंकेने जिंकला तर अशा स्थितीत भारत, न्यूझीलंड आणि श्रीलंकेचे प्रत्येकी 6 गुण होतील. मग येथे निर्णय हा नेट रनरेटच्या आधारावर होईल.