दहावी बारावी परीक्षेचे शुल्क ५० रुपयांनी वाढविले
ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर
बारावीच्या उशिरा अर्जासाठी मुदत ३ नोव्हेंबरपर्यंत
पालक आणि शिक्षण वर्तुळाकडून शुल्कवाढीवर नाराजी
यावर्षीच्या दहावी आणि दारावीच्या परीक्षांसाठीची नावनोंदणी अर्जाची मुदत आठ दिवसांनी म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी संपणार आहे, यंदा माध्यमिक उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने परीक्षेचे शुल्क ५० रुपयांनी वाढवलेले आहे. मात्र, सर्वसामान्य विद्यार्थी महागाईमध्ये होरपळलेला असताना है परीक्षा शुल्क गढायला नको होते, अशी प्रतिक्रिया शिक्षण वर्तुळातून उमटलेली आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षासाठी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी १ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन प्रवेश नोंदणी करणे आवश्यक आहे. व्यवसाय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आयटीआय संस्थांमार्फत ऑनलाइन अर्ज नोंदणी करणे बंधनकारक असून, अर्ज प्राचार्यांद्वारेच सादर केले जातील.
Scholarship Exam 2025-26 : शिक्षण विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शिष्यवृत्ती परीक्षा आता पूर्वीप्रमाणे ४ थी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठीमागील वर्षी दहावीच्या परीक्षेसाठीचे शुल्क ४२० रुपये होते. यंदा ते ४७० इतके झाले, तर बारावीचे शुल्क ४४० होते. यंदा त्यात ५० रुपयांनी वाढवून ४९० इतके शुल्क केले. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पेपर किमतीमध्ये वाढ व इतर अनुषंगिक खर्चामुळे परीक्षा शुल्क वाढविल्याचे स्पष्ट केले. तर पालक शरद गायकवाड़ यांनी महागाईत परीक्षा शुल्क वाढवायला नको होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
Maharashtra Rain Alert : ऐन दिवाळीत पावसाचा हाहाकार! विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस, आज ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचापरीक्षा मंडळाने म्हटले आहे की, बारावी परीक्षेचा उशिरा अर्ज भरण्यासाठी २१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. परीक्षा शुल्क ७ नोव्हेंबर, तर शाळांनी मंडळाकडे विद्यार्थ्यांच्या याशा जमा करण्याची मुदत १० नोव्हेंबर असल्याचे परीक्षा मंडळाने जाहीर केले आहे. मात्र, यासंदर्भात प्राचार्यांनी विद्यार्थ्यांची माहिती पडताळणी आवश्यक असल्याचंही म्हटलं आहे.