जर मर्द असशील तर.., तालीबानचं पाकिस्तानचे आर्मी चीफ असीम मुनीर यांना ओपन चॅलेंज
GH News October 23, 2025 11:11 PM

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर असताना पाकिस्तानने अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक केला होता, त्यानंतर अफगाणिस्तानकडून देखील पाकिस्तानला जशास तसं प्रत्युत्तर देण्यात आलं, यावेळी झालेल्या चकमकीमध्ये पाकिस्तानचे 58 सैनिक मारल्याचा तसेच 30 सैनिक जखमी झाल्याचा दावा तालीबानकडून करण्यात आला होता, या चकमकीमध्ये तालीबानचे देखील 9 सौनिक मारले गेले होते. त्यानंतर आखाती देशांच्या मध्यस्थीने अफागाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम घडून आला.

मात्र जरी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये युद्ध विराम झाला असला तरी देखील मधून-मधून हा संघर्ष उफाळून येत असल्याचं पहायला मिळत आहे. पाकिस्तान तालीबान (TTP) ने पुन्हा एकदा आता थेट पाकिस्तानी आर्मीचा चीफ असलेल्या असीम मुनीर यांना धमकी दिली आहे, जर तू मर्द असशील तर आमचा सामना कर असं टीटीपीनं म्हटलं आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

टीटीपीच्या एका कमांडरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये या कमांडरने म्हटलं आहे की, सैनिकांना मरण्यासाठी आमच्याकडे पाठवू नकोस, त्यांच्याऐवजी तुमच्या सैन्यदलातील टॉपचे अधिकारी आमच्यासोबत युद्धासाठी पाठव. तू जर मर्द असशील तर आमचा सामना कर असं या व्हिडीओमध्ये असीम मुनीर यांना धमकी देताना म्हटलं आहे.

एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टनुसार हे सर्व व्हिडीओ आठ ऑक्टोबर रोजीचे खैबर पख्तनुख्वाच्या कुर्रम परिसरातील आहेत. या ठिकाणी जी चकमक झाली होती, त्यामध्ये टीटीपीने पाकिस्तानच्या 22 सैनिकांना मारलं होतं, त्यानंतर हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे, ज्यामध्ये थेट पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना धमकी देण्यात आली आहे. तू जर मर्द असशील तर तुमच्या सौनिकांना आमचा समाना करायला पाठवू नको, टॉपचे अधिकारी पाठवं असं या टीटीपीच्या कमांडरने असीम मुनील यांना उद्देशून म्हटलं आहे. दरम्यान या व्हिडीओवर अजूनपर्यंत पाकिस्तानकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये, हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.