Shocking News : मुंबई हादरली! बंद कारमध्ये आढळलं नवजात बाळ, VIDEO व्हायरल; नेमकं प्रकरण काय?
Saam TV October 23, 2025 06:45 PM

गोरेगावमध्ये पार्क व्हॅनमध्ये पोलिसांना नवजात बाळ सापडले

निर्भया पथकाच्या मदतीने बाळावर तातडीने उपचार करण्यात आले

डॉक्टरांनी बाळ सुरक्षित असल्याचे सांगितले आहे

पोलिसांकडून बाळाच्या पालकांचा शोध सुरू आहे

मुंबईतून हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. गोरेगावमध्ये पार्क केलेल्या व्हॅनमध्ये पोलिसांना नवजात बाळ आढळले आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या पायाखालची जमीन हादरली. पोलीस या बाळाच्या आईवडिलांचा शोध घेत असून या घटनेची माहिती मुंबई पोलिसांच्या अधिकृत एक्स हँडलने शेअर केली आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्रीच्या सुमारास बीट मार्शल परिसरात गस्त घालत होते. यादरम्यान त्यांना रस्त्याच्या एका मंद प्रकाशाच्या भागातून जोरजोरात रडण्याचे आवाज ऐकू आले. पोलिसांनी आवाजाच्या दिशेने वाटचाल केली असता त्यांच्या लक्षात आले की हा आवाज तिथे पार्क केलेल्या गाडीतून येत आहे.

Scholarship Exam 2025-26 : शिक्षण विभागाचा ऐतिहासिक निर्णय; शिष्यवृत्ती परीक्षा आता पूर्वीप्रमाणे ४ थी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी

घटनास्थळी अधिक तपास केला असता त्यांना कापडात गुंडाळलेले बाळ उघड्यावर सोडलेले आढळले. या घटनेनंतर पोलिसांनी आजूबाजूला शोधाशोध केली असता रात्रीच्या काळोखात तिथे कोणीच सापडले नाही. तातडीने कारवाई करत, अधिकाऱ्यांनी निर्भया पथकाच्या मदतीने नवजात बाळाला वैद्यकीय सेवेसाठी शताब्दी रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी ताबडतोब उपचार केले आणि बाळ सुरक्षित आणि स्थिर असल्याचे सांगितले. या घटनेची माहिती मुंबई पोलिसांच्या अधिकृत एक्स हँडलने शेअर केली. डॉक्टरांच्या आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर बाळाला सोडण्यात आले. निर्भया पथकाच्या मदतीमुळे, बाळाला नंतर अंधेरी (पश्चिम) येथील सेंट कॅथरीन होम येथे सोपवण्यात आले. ही बालसंगोपन संस्था सोडून दिलेल्या आणि अनाथ मुलांची काळजी घेते.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाची उघडीप, 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

दरम्यान पोलीस या बाळाच्या आईवडिलांचा शोध घेत असून पोलिसांनी बाळाला सोडून देण्याशी संबंधित पालकांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र या बाळाला इथे सोडण्यामागचं नेमकं कारण काय ? आणि त्याचे आई वडील नक्की कोण आहेत ? हे अनुत्तरित आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.