प्रवाशांसाठी खूशखबर! कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास फक्त ४५ मिनिटांत; किती स्थानके अन् रूट कसा?
Saam TV October 23, 2025 02:45 PM

मुंबईसह सर्व उपनगरांत मेट्रोचं जाळं हळूहळू पसरत चाललं आहे. काही मेट्रो प्रकल्प अंतिम टप्प्यावर पोहोचले आहेत. तर, काहींचं बांधकाम वेगाने सुरू आहे. यातीलच महत्वाचा प्रकल्प म्हणजे मु्ंबई मेट्रो लाईन १२. या मुख्य मार्गिकेमुळे कल्याण आणि तळोजा ही शहरे थेट जोडली जाणार आहे. तसेच या मेट्रोमुळे मुंबई शहर ठाण्याला जोडले जाणार आहे. मेट्रो १२ ही मार्गिका ऑरेंज लाइन म्हणून ओळखली जाणार असून, ती मेट्रो लाइन ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण)चा विस्तारीत भाग आहे.

मागील वर्षी या मेट्रोचंभूमीपूजन पार पडलं होतं. सध्या या प्रकल्पाचे खांब उभारण्याचे काम सुरू आहे. वर्षभराच्या आत मोठ्या प्रमाणात बांधकाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. इंटरनेटवरील एका युजरने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मेट्रो लाईन १२ हे भारतातील सर्वात वेगाने उभे राहणारे मेट्रो प्रकल्पांपैकी एक आहे. विशेष म्हणजे मार्गिका आणि डेपोचे काम एकाच वेळी सुरू असल्याचं प्रथमच पाहायला मिळतेय.

लँडिंग होताना हेलिपॅड खचला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हेलिकॉप्टरला भयंकर अपघात; VIDEO व्हायरल

मुंबई मेट्रो १२हा प्रकल्प पूर्णपणे उन्नत असेल. या प्रकल्पाची एकूण लांबी २२.१७किमी असेल. तर, या मार्गिकेवर १९ स्थानके असणार असून, एपीएमसी कल्याण ते अमनदूत तळोजा अशी ही मार्गिका असणार आहे. या मार्गिकेल २ इंटरचेंज असणार आहे. पहिली मुंबई मेट्रो लाइन ५वरील कल्याण एपीएमसी. दुसरा म्हणजे नवी मुंबई मेट्रो लाइन १वरील अमनदूत तळोजा येथे कनेक्ट होईल.

सुवर्णनगरीत सोन्याचे दर घसरले; दिवाळी पाडव्याला जोडीदारासाठी घ्या गिफ्ट ; पाहा आजचा लेटेस्ट भाव

या मेट्रोमुळे कल्याण डोंबिवली ते नवी मु्ंबईचा प्रवास फक्त ४५ मिनिटांत पूर्ण होणार आहे. २०२७ पर्यंत ही मेट्रो मार्गिका सेवेत येणार आहे.

स्थानकांची य़ादी

कल्याण, कल्याण एपीएमसी, गणेश नगर, पिसावली, गोलवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाकलन, तुर्भे, पिसार्वे डेपो आणि तळोजा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.