झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना पार पडला. हा सामना सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला. या सामन्यात झिम्बाब्वेने अफगाणिस्तानला एक डाव आणि 73 धावांनी लोळवलं. या विजयानंतर अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली. (Photo: Zimbabwe X)
झिम्बाब्वेने 24 वर्षांनंतर एका डावाच्या फरकाने कसोटी सामना जिंकला. यापूर्वी 1995 मध्ये झिम्बाब्वेने पाकिस्तानला एक डाव आणि 64 धावांनी हरवले. 2001 मध्ये झिम्बाब्वेने बांगलादेशला एका डावाने पराभूत केले होते. इतकंच काय तर 12 वर्षांनंतर झिम्बाब्वेने घरच्या मैदानावर कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रमही केला. (Photo: Zimbabwe X)
झिम्बाब्वेने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. अफगाणिस्तानने पहिल्या डावात 127 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या झिम्बाब्वेने 359 धावा केल्या आणि 232 धावांची मजबूत आघाडी घेतली. ही आघाडी मोडून काढताना अफगाणिस्तानचा संघ 159 धावांवर बाद झाला. (Photo: Zimbabwe X)
झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एर्विनने सांगितलं की, ‘मी खूप आनंदी आहे. कठोर संघर्ष केल्याबद्दल मुलांना खूप श्रेय द्यायचे आहे. नाणेफेक जिंकणे हा कोड्याचा पहिला भाग होता. पहिला तास चांगला नव्हता. पण गोलंदाजांनी झुंज दिली. बेनचा डाव अद्भुत होता. खूप प्रभावित झाला. विकेटने संपूर्ण खेळात काहीतरी दिले. गेल्या 6-7 महिन्यांत आम्ही खेळलेल्या कसोटी क्रिकेटमधून खेळाडूंनी बरेच काही शिकले आहे.’ (Photo: Zimbabwe X)
कसोटी विजयाचा शिल्पकार ठरला तो बेन करन.. बेन करनने 256 चेंडूत 121 धावांची खेळी केली. त्यामुळे सामनावीराच्या पुरस्कारानंतर त्याने सांगितलं की, ‘वैयक्तिक कामगिरीने आनंदित. विजयाने उत्साहित. अर्थातच इंग्लंडमध्ये झालेल्या दुखापतीतून परत येत आहे. कसोटी सामन्यात खेळताना थोडेसे गोंधळलेले होते. मी फलंदाजी प्रशिक्षकाचे आभार मानतो. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला ते बदल करावे लागतील. सुदैवाने यशस्वी झाले.’ (Photo: Zimbabwe X)