चिखली : दिवाळीच्या सणाच्या दिवशी अमडापूर–चिखली मार्गावर झालेल्या अपघातात बुलडाणा अर्बन बँकेच्या मुख्य शाखेतील कर्मचारी विजय ओंकार गिरी (वय ४५, रा. डोंगर खंडाळा) यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या अवघ्या एक तास आधी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय गिरी हे एमएच-२८ एए-६०९४ या दुचाकीने हिवरा आश्रमकडे जात असताना अमडापूरजवळील महादेव मंदिराजवळ ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की विजय गिरी ट्रकखाली चिरडले गेले आणि जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने वाहनासह पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुण विजय केळोदे व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अमडापूर पोलिसांनी मृतदेह रुग्णवाहिनी द्वारे रुग्णालयात हलवून रहदारी सुरळीत केली. सध्या ट्रकचालकाच्या शोधासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Koregaon Crime: 'जयपूरमध्ये जमिनीच्या वादातून कोयत्याने वार'; रहिमतपूर पोलिस ठाण्यात परस्परविरुद्ध ११ जणांवर गुन्हादिवाळीच्या दिवशीच ही ह्रदयद्रावक घटना घडल्याने डोंगर खंडाळा गावात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, विजय गिरी यांच्या मातोश्री चंद्रकलाबाई गिरी यांचे अवघ्या सोळा दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या अपघाती मृत्यूने गिरी परिवारावर दुहेरी आघात झाला आहे. त्यांनी मागे वृद्ध वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार सोडला आहे.कर्तव्यनिष्ठ, मनमिळावू व समाजहितैषी स्वभावामुळे विजय गिरी यांचा बँक व सामाजिक क्षेत्रात लौकिक होता. त्यांच्या अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.