PM Narendra Modi: 'सिंदूर'ने अन्यायाचा बदला घेतला : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सुरक्षा दलाचे कौतुक
esakal October 24, 2025 01:45 AM

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारताने केवळ धर्माचे पालन केले असे नाही तर अन्यायाचाही बदला घेतला, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नावाने लिहिलेल्या पत्रात केले आहे.

प्रभू श्रीराम आपणास धर्माचे पालन करण्यास शिकवतात आणि अन्यायाविरोधात लढण्याची शक्ती देतात, त्यामुळे त्यांची प्रेरणा घ्यावी, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि नक्षलवादाविरोधातील अभियानात मिळालेल्या यशाबद्दल मोदी यांनी सुरक्षा दलांचे कौतुक केले. अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाल्यानंतरची ही दुसरी दिवाळी असल्याचे सांगत मोदी पत्रात पुढे म्हणतात की, देशातील काही भागात नक्षलवाद मुळापासून खातमा झाला आहे.

या भागात पहिल्यांदाच दिवाळी साजरी होत आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी खास ठरत आहे. हिंसेचा मार्ग सोडून राज्यघटनेवर विश्वास ठेवत लोक विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होत आहेत. देशासाठी ही मोठी उपलब्धी आहे. अलीकडील काळात देशाने भावी पिढ्यांच्या सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जीएसटी कराचे कमी झालेले दर अंमलात आले. जीएसटी बचत उत्सवामुळे नागरिक कोट्यवधी रुपयांची बचत करत आहेत. एकीकडे जग अनेक संकटाशी झुंज देत असताना दुसरीकडे भारत स्थिरता आणि संवेदनशीलता अशा दोन्हींचे प्रतीक बनला आहे. भविष्यात आपला देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या या यात्रेत नागरिक म्हणून राष्ट्रप्रतीची नागरिकांची जबाबदारी महत्त्वाची आहे.

PM Narendra Modi: सेवा आणि शिस्त हीच संघाची ताकत: पंतप्रधान नरेंद्र मोदी; नैसर्गिक संकटात मदतीसाठी स्वयंसेवक पुढे असतात

गर्वाने स्वदेशीचा पुरस्कार करणे आणि स्वदेशीचा अंगीकार करणे ही आपली जबाबदारी आहे, असे मोदी म्हणाले. नागरिकांनी सर्व भाषांचा सन्मान करावा. एक भारत-श्रेष्ठ भारत भावनेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करत मोदी म्हणाले की, जेव्हा एक दिवा दुसऱ्या दिव्याला प्रकाशमान करतो, तेव्हा त्यामुळे प्रकाश कमी होत नाही. उलट यामुळे प्रकाशात वाढ होते. याच भावनेने आपण समाज आणि आपल्या आसपासचा सद्भव, सहयोग आणि सकारात्मकतेचा दिवा प्रज्वलित केला पाहिजे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.