सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटींनी देखील दिवाळी साजरी केली आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालने देखील त्यांच्या नवीन घरात दिवाळी साजरी केली आहे. सोनाक्षीने तिचे सासरची मंडली तसेच तिच्या मित्रांसोबत दिवाळी साजरी केली. सोनाक्षीने चाहत्यांना तिच्या नवीन घराची झलक दाखवली. फोटोंमध्ये सोनाक्षी आणि झहीर खूप आनंदी दिसत होते आणि त्यांनी त्यांच्या मित्रांसोबत खूप मजा केलेलीही दिसून येत होती.
सोनाक्षी सिन्हाने तिचा पती झहीर इक्बालसोबत नवीन घरात सेलिब्रेट केली दिवाळी
सोनाक्षी सिन्हाने तिचा पती झहीर इक्बालसोबत नवीन घरात दिवाळी हा पहिला सण साजरा केला. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे जी फॅमिली अल्बमसारखी दिसते. पोस्टमध्ये सोनाक्षी, झहीर, तिचे सासरे, सासू आणि इतर सासरे तसेच जवळच्या मित्रांचे फोटो आहेत. तसेच फोटोंमध्ये घरात दिवाळीची केलेली सजावटही दाखवली आहे. ज्यामध्ये मेणबत्ती, झेंडूच्या माळा, फुलांची सजावट आणि तसेच दिवे यांचा समावेश आहे.
सोनाक्षीचे तिच्या सासू-सासऱ्यांसोबत फोटो
दरम्यान सोनाक्षीने दिवाळी पार्टीसाठी निळ्या रंगाचा मॅक्सी गाऊन घातलेला दिसत आहे, तर झहीर इक्बाल पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी त्यांच्या घराचे सुंदर वातावरण तयार केल्याचं या फोटोंमध्ये दिसत आहे. सोनाक्षीने तिच्या सासू-सासऱ्यांसोबतही फोटो काढले आहेत. या फोटोंमधून दिसून येते की सोनाक्षीचे तिच्या सासरच्या मंडळींशी किती मैत्रिपूर्ण नाते आहे.
View this post on Instagram
A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)
सोनाक्षीने पती झहीर अन् मित्रांसोबत खेळले पत्ते
कुटुंबासोबतच मित्रांची उपस्थिती आहे. सोनाक्षीने पती झहीर अन् मित्रांसोबत पत्ते खेळल्याचं दिसून येत आहे. तसेच सोनाक्षी सिन्हाने तिचा पती झहीरसोबतचे रोमँटिक फोटोही शेअर केले आहेत. दोघांमध्ये उत्तम केमिस्ट्री आहे. सोनाक्षी सिन्हाने फोटो शेअर करत लिहिले, “घरी आल्यासारखे वाटते.” चाहते तिच्या फोटोंवर कमेंट करत आहेत आणि तिचे अभिनंदन करत आहेत. सोनाक्षी आणि झहीरने त्यांच्या लग्नादरम्यान हे घर खरेदी केले होते. नूतनीकरणासाठी 10 महिन्यांहून अधिक काळ लागला.