वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत दक्षिण विरूद्धच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून पाकिस्तानने मोठी झेप घेतली होती. पाकिस्तानने दक्षिण अफ्रिकेला पहिल्या कसोटीत 93 धावांनी पराभूत केलं होतं. या विजयासह 100 टक्के विजयी टक्केवारीसह पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियासोबत पहिल्या स्थानावर बसला होता. मात्र हा भ्रमाचा भोपळा 8 दिवसातच फुटला. दक्षिण अफ्रिकेने पाकिस्तानने दुसऱ्या कसोटी सामन्यात 8 गडी राखून पराभूत केलं. दक्षिण अफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करत विजयाचं खांत खोललं आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना गमावला आणि टॉप 2 संघातून बाहेर पडला. तर टीम इंडियाला जबरदस्त फायदा झाला असून तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर पाकिस्तानचा संघाची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. तर इंग्लंडचं नुकसान झालं आहे.
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 3 कसोटी सामने खेळले असून तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. याह विजयी टक्केवारी 100 असून पहिल्या स्थानावर आहे. श्रीलंकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील एक सामना जिंकला, तर एक सामना ड्रॉ झाला होता. त्यामुळे 66.67 विजयी टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताने एकूण 7 कसोटी सामने खेळले असून 4 सामन्यात विजय, 2 सामन्यात पराभूत, तर एक सामना ड्रॉ झाला होता. यासह भारताची विजयी टक्केवारी ही 61.90 असून तिसऱ्या स्थानावर आहे.
दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. ही मालिका बरोबरीत सुटल्याने दोघांची विजयी टक्केवारी ही 50 असून संयुक्तरित्या चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेनंतर इंग्लंडला धक्का बसला आहे. इंग्लंडने पाच कसोटी सामने खेळले असून दोन सामन्यात विजय, दोन सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला. त्यात इंग्लंडला -2 गुणांची पॅनेल्टी लागली आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी 43.33 टक्के असून सहाव्या स्थानी आहे.
बांगलादेशचा संघ सातव्या स्थानावर असून दोन सामन्यापैकी एक सामना गमावला तर एक सामना ड्रॉ झाला. त्यामुळे विजयी टक्केवारी ही 16.67 असून सातव्या स्थानी आहे. न्यूझीलंडचा संघ आठव्या स्थानावर असून त्यांनी आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. वेस्ट इंडिजचा संघ सर्वात शेवटच्या स्थानी असून 5 पैकी 5 सामने गमावले आहेत. त्यांची विजयी टक्केवारी ही शून्य आहे.