इराणचे वाढत्या महागाईने अक्षरश: कंबरडे मोडले आहे. याचा अंदाज यावरुन लावू शकता की आता अंतिम संस्काराचा खर्च देखील हप्त्याने चुकवला जात आहे. अनेक कुटुंबिय आता आपल्या प्रियजनांच्या मृत्यूनंतर कबरीसाठी हप्त्याने संगमरवरी लाद्या घेत आहेत. त्यामुळे सेकंड हँण्ड कबरीच्या लाद्या विकल्या (Tombstone) जात आहेत. त्यामुळे आर्थिक दबाव आणि महागाई कशा प्रकारे वाढली आहे याचा पुरावा आहे.
इराणमध्ये महागाई लोकांच्या जीवनात अशा प्रकारे घुसली आहे. बातमीनुसार महागाई, राहाणीमानाचा वाढता खर्च यामुळे मध्यम आणि गरीब वर्गाची क्रयशक्ती कमी झाली आहे. त्यामुळे आप्तांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कबरीला खर्च करणे परवडेनासे झाल्याने हे साहित्य देखील हप्त्यावर घेतले जात आहे.
बातमीनुसार यावर्षाच्या पहिल्या साह महिन्यात महागाईचा दर ४५ टक्यांहून अधिक राहिला आहे. घरे खरेदीची क्षमता प्रचंड घसरली आहे. आधी ज्या वस्तूंना अनावश्यक वा विलासी मानले जात होते. त्या आता खरोखरीच आर्थिक ओझे बनल्या आहेत. गेल्या काही वर्षांत इराणच्या मिडीयात बातम्या येत आहेत की लोक रोजच्या गरजेच्या वस्तूंही हप्त्याने घेत आहेत. उदा. मांस, तांदुळ, दूध, तेल, कपडे, बुट, इलेक्ट्रॉनिक सामान, एवढेच का डिटर्जेंटपर्यंतच्या वस्तू हप्त्याने घेतल्या जात आहेत.
महागाई इतकी वाढली आहे की आता टॉम्बस्टोन विकणाऱ्या दुकानदारांना या वस्तू हप्त्यांवर देण्याचा पर्याय सुरु केला आहे.लोक दोन ते सहा महिन्यांच्या हप्त्यांत पैसे चुकवत आहेत. काही दुकानदार तर बिना व्याज तसेच गॅरंटरची सुद्धा सुविधा देत आहेत.
साधारण आणि स्वस्तातील कबरीच्या लाद्यांची किंमत सुमारे १० ते २० लाख तोमानपर्यंत आहेत. तर मार्बल आणि ग्रेनाईट सारख्या महागड्या दगडांच्या डिझायनर पट्ट्या ८० लाखापासून ते एक अब्ज तोमान वा त्याहून जास्त किंमतीच्या आहेत. बातमीत हे देखील म्हटले आहे की जुन्या कबरीच्या पट्ट्या स्वस्तातील भावात मिळत आहेत. यांची देखील हप्त्याने विक्री चालू आहे.
बातमीनुसार इराणमध्ये सँकड हँड सामानाचा बाजार खूप वाढला आहे. ज्या वस्तू पूर्वी कचऱ्यात फेकल्या जात होत्या. त्या आता वेबसाईटवर विकल्या जात आहेत. उदाहरणार्थ खाली दिलेले जुन्या वस्तूंचे रेट कार्ड पाहा
रिकाम डबा : २०,००० तोमान
जुनी बाहुली : १००,००० तोमान
सेकंड-हँड मोबाईल कव्हर : १२०,००० तोमान
वापरलेली लिपस्टीक : १६०,००० तोमान
जुन्या चपला: ८०,००० तोमान
नवा वाटणार अंडरविअर: ३००,००० तोमान
ताज्या बातम्यांनुसार इराणमध्ये अंड्यांच्या किंमतीत आता उन्हाळ्यापेक्षा ६० टक्के वाढ झाली आहे. आता ६ ट्रे ( ३० अंडी प्रति ट्रे ) वाला कार्टन ७००,००० तोमानला मिळायचा. आता १,१००,००० तोमान मध्ये मिळत आहे. प्रत्येक अंडे आता ग्राहकांना सुमारे ७,००० ते ८,००० तोमानला पडत आहे.(१०.१२ रुपये ) याच प्रकारे परदेशी चहा ( इराणी पॅकजिंगमध्ये )चा अर्धा किलोचे पाकिटाची किंमत ५७५,००० तोमानवरुन वाढून ६४०,००० तोमान झाली आहे.