Lodha Altamount – Antlia : भारतात एकाहून एक महागडे घर आहे. यामध्ये सर्वात महागडे घर मुकेश अंबानी (Mukesh Ambani Net Worth) यांचे आहे. ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्स मासिकानुसार, अंबानी यांची नेटवर्थ 9.56 लाख कोटी रुपये इतकी आहे. अंबानींचे मुंबईत घर आहे. त्याचे नाव अँटालिया आहे. ही इमारत जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. या इमारतीचे मूल्य जवळपास 15,000 कोटी रुपयांपर्यंत आहे. पण मुंबईत अँटालियाला एका गगनचुंबी इमारतीने मागे टाकले आहे. या नवीन इमारतीने अँटालियाला टक्कर दिली आहे. कोण आहे या इमारतीचे मालक?
काय आहे बिल्डिंगचे नाव
लोढा ग्रुपची लक्झरी गगनचुंबी इमारत Lodha Altamount अँटालियाजवळच आहे. ही इमारत अँटालियापेक्षा जास्त उंच आहे. अंटालियाची उंची 173 मीटर इतकी आहे. तर Lodha Altamount ची उंची त्यापेक्षा अधिक 195 मीटर इतकी आहे. लोढा अल्टामाऊंट, अल्टामाऊंट रोडमध्ये फोर्जेट हिल रोडवर अँटालिया हाऊसच्या समोरच आहे.
बहुमजली अपार्टमेंट टॉवर
लोढा अल्टामाऊंट एक बहुमजली अपार्टमेंट टॉवर आहे. यामध्ये एकूण 45 मजले आहेत आणि 52 सदनिका आहेत. ही इमारत जिथे तयार झाली आहे. तो परिसर देशातील सर्वात महागडा मानल्या जातो. लोढा अल्टामाऊंट प्रकल्पासाठी जवळपास 1,100 कोटी रुपये खर्च आला. ही एक आलिशान रहिवाशी गगनचुंबी 45 मजली इमारत आहे. या इमारतीचा बिल्टअप परिसर 20 लक्ष चौरस फुट आहे.
कोणी केली घरांची खरेदी
अल्टामाऊंट रोडवर कॉर्पोरेट कुटुंब, बडे सनदी अधिकारी, देशातील प्रभावशाली कुटुंब आणि इतर देशांचे राजदूत राहतात. त्यामुळे या इमारतीला बिलिनिअर्स रो असे नाव मिळाले आहे. यामध्ये अनेक श्रीमंतांनी लोढा अल्टामाऊंटमध्ये घर खरेदी केले आहे. या इमारतीच्या एका मजल्यावर केवळ एकच कुटुंब आहे. भलामोठा मजला प्रत्येक कुटुंबाचे खासगीपण जपतो. प्रत्येक मजला हा काचेच्या तावदानाने अच्छादित आहे. त्यामुळे बाहेरच्या जगाला आतामध्ये कोण लोक राहतात. ते काय करतात. याचा थांगपत्ता लागत नाही.
लोढा समूहाचे मालक कोण?
अभिषेक लोढा हे लोढा समूहाचे मालक आहेत. या समूहाने 65000 हून अधिक घरांची निर्मिती केली आहे. कंपनीचा व्यवसाय मुंबई, ठाणे, पुणे, बेंगळुरु आणि लंडनपर्यंत पसरला आहे. ही कंपनी 44 वर्षे जुनी आहे. या कंपनीकडे एकाचवेळी 40 ऑपरेटिंग प्रकल्प आहे. कंपनीने आतापर्यंत 100 दशलक्ष चौरस फुट क्षेत्रफळ वितरीत केले आहे.