बालकनीतून पाय घसरला, नवरा ग्रिलमध्ये अडकला, पत्नीने पळत जाऊन हात पकडला, पण…
Tv9 Marathi October 25, 2025 12:45 PM

नियतीच्या मनात काय आहे? हे कोणीच सांगू शकत नाही. दीर्घायुष्य आहे की, अल्पायुष्य हे कोणालाच ठाऊक नसतं. ते वेळ आणि काळ ठरवतो. आपण अनेकदा देव तारी, त्याला कोण मारी असं ऐकलय. एखाद्या दुर्घटनेत माणसाचे प्राण वाचणं हे कुठल्या चमत्कारापेक्षा कमी नसतं. पण प्रत्येकवेळीच असं घडत असं होत नाही. कुदसद गावात अशीच एक दुर्देवी घटना घडली. आनंदाचं वातावरण अचानक दु:खात बदललं. सगळेच स्तब्ध झाले. एकाक्षणात कुटुंबाच्या चेहऱ्यावरच आनंद, अश्रुंमध्ये बदलला. कुदसद गावातील चिराड रेसीडेन्सी या सोसायटीत एका दुर्देवा घटना घडली. दुसऱ्या मजल्यावरुन पडून एका युवकाचा मृत्यू झाला. हा सर्व घटनाक्रम इतक्या वेगात घडला, की क्षणात आनंद दु:खामध्ये बदलला. खाली पडल्यानंतर युवकाचा मृत्यू झाला. कुटुंबियांची अवस्था पाहून सगळेच हळहळले. गुजरातच्या सूरत जिल्हायात ओलापाड तालुक्यात ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, युवक बालकनीत उभा होता. त्याचवेळी अचानक त्याचा पाय घसरुन तो बिल्डिंगच्या ग्रिलमध्ये अडकला. त्याला वाचवण्यासाठी पत्नी पळाली. तिने तिथे पोहोचून त्याला वाचवण्याचे सर्व प्रयत्न केले. पण नशिबाला काही वेगळच मंजूर होतं. पत्नीने युवकाचा हात पकडलेला. पण तिला जास्तवेळ हात पकडून ठेवता आला नाही. युवकाचा हात सुटला. तो थेट खाली पडला. कोणीतरी खाली पडल्याचा मोठा आवाज झाला. लोक पळत आले. पण तो पर्यंत उशीर झालेला. युवकाने जागीच प्राण सोडले.

घटनेमुळे सगळेच हैराण

स्थानिकांनी सांगितलं की, हे सर्व काही क्षणात घडलं. ज्यांनी हे सर्व पाहिलं ते मूळापासून हादरले. मृत युवक ओदिशाचा राहणारा होता. तो काही काळापूर्वी कामासाठी सूरतला आलेला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमला पाठवला. संपूर्ण परिसरात शोकमग्न वातावरण आहे. आसपासच्या लोकांनी युवकाच्या पत्नीला धीर देत कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केली. ऐन दिवाळी सणात घडलेल्या या घटनेमुळे सगळेच हैराण झाले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.