सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक मजेशीर व्हिडीओ चांगला व्हायरल होत आहे. एका घराचा हा व्हिडीओ असून त्या घराच्या खिडकीतून चोर घरात शिरण्याचा प्रयत्न करतो. परंतू या चोराचा बंदोबस्त करण्यासाठी घरच्यांनी एका पहारेदाराला नेमल्याचे या चोराच्या गावीही नव्हते. जशी चोराने खिडकीतून घरात एण्ट्री केली तसे हा पोपट जोराने ओरडतो की चोराची अशी फटफजिती होते की हा व्हिडीओ पाहून हसायला येते.
एका घराच्या हॉलमधील गॅलरीतून चोर घरात शिरताना या व्हिडीओत दिसत आहे. घराच्या गॅलरीतील काचेच्या खिडक्यांना सरकवत चोर जशी या घरात एण्ट्री मारतो. तसा हा पोपट जोराने ओरडायला सुरुवात करता दिसतो. अचानक झालेल्या या हल्ल्याने चोराला मोठा धक्का बसतो. आणि चोर आल्या पावली माघारी फिरतो. पोपटाचा आवाज शांततेला भंग करतो आणि त्यामुळे चोराला घाम फुटतो आणि तो आल्या पावली पुन्हा माघारी फिरताना या व्हिडीओत दिसत आहे.
पोपटाला चोर घाबरतो..व्हिडीओच्या सुरुवातीलाच एक चोर रात्रीच्या अंधारात घरातील खिडकीतून घुसताना या व्हिडीओत दिसत आहे. जसा चोर या घराच्या हॉलमध्ये खिडकीतून एण्ट्री घेतो तसा पोपट अलर्ट होतो आणि पोपट जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो.
पोपटाच्या ओरड्याच्या आवाजाने घरातले उठणार या भीतीने चोर ज्या खिडकीतून आत येत होता त्याच खिडकीतून आल्या पावली निघून जातो.या पोपटाचा आवाज ऐकून घरातील गृहिणी बेडरुममधून हॉलमध्ये येते आणि लाईट पेटवते. परंतू तोपर्यंत चोर पळून गेलेला असतो. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक हा व्हिडीओ पाहून हसून लोटपोट होत आहेत. कारण चोराची रिएक्शन इतकी जलद होते की हसू आवरता आवरत नाही.
व्हिडीओवर मजेदार कमेंट्स –सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर लोक मजेदार कमेंट्स करत आहेत. काही लोकांनी कमेंट्स केली आहे की कुत्रे आणि पोपट चोरी रोखू शकतात. चोर देखील आता म्हणतील की पोपट सुपरस्टार असतात. तर एका युजरने लिहीलेय की असा नाईट गार्ड असणे खूप चांगले आहे.
येथे पाहा व्हिडीओ –
चोर के घुसते ही शोर मचा दिया…. ग़ज़ब का सिक्योरिटी गार्ड है।
चोर आ गए चोर……🦜😂 pic.twitter.com/KKpBYdPRTO— Shagufta khan (@Digital_khan01)
काहींनी लिहीलेय की छोटा जीव देखील मोठ्या कामी येऊ शकतो. एका युजरने लिहिलेय की आंटीने Z+ सिक्युरिटी गार्ड ठेवला आहे. या व्हिडीओवर असे अनेक मजेशीर कमेंट्स आलेले आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक मजा घेत आहेत. आणि या व्हिडीओला शेअर देखील करत आहेत.