Travel Without Passport : कोणत्याही देशात जायचे असेल तर सर्वात अगोदर पासपोर्ट, व्हिसा आणि विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेचा सामना हे करावेच लागते. त्यात व्हिसाचा एक अडथळा मित्र देशात कमी असतो. पण या तीन व्यक्तींना या कोणत्याच प्रक्रियेचा सामना करावा लागत नाही. ते कोणत्याही देशात विना पासपोर्ट, कोणत्याही अडथळ्याशिवाय जाऊ शकतात. जगातील या तीन लोकांकडेच हा शाही अधिकार आहे. त्यामध्ये ब्रिटनचा राजा चार्ल्स III, जापानचे सम्राट नारुहितो आणि महारानी या तीन व्यक्तींचा समावेश आहे.
या तिघांना का नको पासपोर्ट?
कोणत्याही पण देशाचा राष्ट्रप्रमुख असो, राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपती वा पंतप्रधान असो त्याला आंतरराष्ट्रीय प्रवासात डिप्लोमॅटिक पासपोर्टची गरज असते. पण या तीन व्यक्तींना पासपोर्ट, व्हिसा अथवा इतर प्रक्रियेची गरज पडत नाही. ते थेट आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडू शकतात. कारण त्यांच्यासाठी जगभरात तशी खास सवलत आहे.
ब्रिटेनचे किंग चार्ल्स III यांना का हा अधिकार?
ब्रिटेनमध्ये अत्यंत खास परंपरा आहे. सर्व ब्रिटिश पासपोर्ट हिज मॅजेस्टी पासपोर्ट म्हणजे राजाच्या नावाने जारी होतात. त्यामुळे किंग चार्ल्स III यांना स्वतः पासपोर्टची गरज नाही. हा विशेषाधिकार पूर्वी एलिझाबेथ II कडे होता. त्यांच्या कार्यकाळात त्यांना कधी पासपोर्टची गरज पडली नाही. 2023 मध्ये चार्ल्स तिसराचा राज्याभिषेक झाला आणि परंपरा तशीच पुढे सुरू राहिली.
जपानचा सम्राट आणि महाराणीला का नाही लागत पासपोर्ट?
जापानमध्ये पण अशीच व्यवस्था आहे. देशाच्या राज्यघटनेनुसार सम्राट नारुहितो आणि महाराणी मासाको यांना प्रतिकात्मक शासक मानल्या जाते. त्यामुले जपानचे सरकार त्यांना पासपोर्ट देत नाही. 2019 मध्ये जेव्हा सम्राट नारुहितो यांनी त्यांचा पहिला परदेश दौरा केला. तेव्हा कोणत्याही कागदपत्रांशिवाय त्यांना ब्रिटेनमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यांचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले.
पासपोर्टच नाही तर या खास सुविधा
या शाही कुटुंबातील प्रमुखांना राजकीय सूट तर मिळतेच पण यांना कोणत्याही देशात कसल्या प्रकारे अटक करता येत नाही. त्यांना नजरकैदेत ठेवता येत नाही. त्यांना कोणत्याही चौकशीचा सुद्धा सामना करावा लागत नाही. 2024 मध्ये महाराणी मासाको जेव्हा युरोपमध्ये गेली. तेव्हा फ्रान्समध्ये विना व्हिसा त्यांना प्रवेश देण्यात आला. तर ऑस्ट्रेलियात किंग चार्ल्स यांच्यासाठी रेड कार्पेट टाकण्यात आले.
UN Secretary-General काय अधिकार
UN Secretary-General पण असाच विशेषाधिकार मिळतो असे अनेका वाटते. पण तसे नाही. त्यांना laissez-passer म्हणजे एक प्रकारचा पासपोर्ट मिळतो. पण त्यांना व्हिसा जवळ बाळगावा लागतो. अर्थात त्यांनाही सवलत आहे. पण जगात फ्री प्रिव्हलेज पासपोर्टची सुविधा केवळ तिघांनाच मिळते. त्यात ब्रिटनचा राजा आणि जपानचा सम्राट आणि महाराणी यांचा समावेश आहे.