बालगृहामध्ये दिवाळी आनंदात साजरी
esakal October 26, 2025 10:45 PM

धोकादायक फटाके न वापरता आनंद लुटा
मुख्य न्यायदंडाधिकारी पिंगळे ः बालगृहामध्ये दिवाळी साजरी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : येथील बालगृहातील ० ते १८ वयोगटातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसोबत कुटुंबाप्रमाणे दिवाळी साजरी करताना धोकादायक फटाक्यांचा वापर न करता आनंदी वातावरणात उत्साहात दिवाळी साजरी करण्याचा सल्ला मुख्य न्यायदंडाधिकारी आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर पिंगळे यांनी दिला
या वेळी मुख्य न्यायदंडाधिकारी आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. एस. पिंगळे, कामगार न्यायालय आणि सहदिवाणी न्यायाधीश एस. वी. जोशी, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग १ आणि बाल न्यायमंडळ अध्यक्ष ए. डी. गाडे, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर न्यायदंडाधिकारी वर्ग १ एस. वाय. शेख यांनी बालगृहातील मुलांना मिठाई, सुकामेवा, उटणं आणि दिवाळीचे इतर साहित्य, शैक्षणिक साहित्य वाटप केले. बालगृहातील मुलांनी तयार केलेले आकाशकंदिल, पणत्या, ग्रिटिंगकार्ड आदी हस्तकला वस्तूंच्या प्रदर्शनास उपस्थित मान्यवरांनी भेट देऊन मुलांचे कौतुक केले.
कामगार न्यायालय आणि सहदिवाणी न्यायाधीश जोशी यांनी दिवाळी हा सणांचा राजा आहे. त्यामुळे या सणाचा आनंद मनमुराद घेऊन किल्ले बनवणे या स्पर्धेत मुलांनी सहभाग घेऊन स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग १ आणि बाल न्यायमंडळ अध्यक्ष ए. डी. गाडे तसेच बालकल्याण समिती सदस्य यांनी उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
---

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.