पाणीवितरण मशीनचा प्रवाशांना अडथळा
मालाड, ता. २६ (बातमीदार) ः कांदिवली रेल्वेस्थानकात असलेल्या पाणीवितरण मशीनचा प्रवाशांना अडथळा होत आहे. मागील काही महिन्यांपासून फलाट क्रमांक एकच्या प्रवेशद्वारालगत ही मशीन बंद अवस्थेत पडून आहे. मशीनजवळून जाताना प्रवासी तंबाखू, पान खाऊन थुंकत असल्याने तिथे दुर्गंधी पसरली आहे. या मशीनचा उपयोग हाेत नसल्याने फलाटावरून मशीन हटवावी, अशी मागणी प्रवाशांची आहे.