आजी जोमात सिंह कोमात! Viral Video ने वेधले अनेकांचे लक्ष
Tv9 Marathi October 27, 2025 06:45 AM

जंगलाचा राजा कोण? असा प्रश्न ऐकला की आपल्या तोडून सिंहाचे नाव येते. सिंहाला पाहिल्यानंतर भल्याभल्यांना घाम फुटतो. मग ते प्राणी असोत वा माणसे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एका आजींनी सिंहाला चक्क काढीने हाकलले आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आजीचे कौतुक केले आहे. त्यांचे धैर्य आणि जिद्द पाहून अनेकांनी त्यांना ही खरी शेरनी असे म्हटले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की सिंह आणि आजी आमनेसामने उभे आहेत. सिंह आजीला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. पण आजी मात्र जराही न घाबरता उलट सिंहाला घाबरवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हे दृश्य पाहण्यासाठी तिथे लोकांची मोठी गर्दी जमली होती. काहींनी आजींच्या या कृत्याचा व्हिडीओ देखील बनवला. आणि त्याहून रंजक म्हणजे व्हिडीओमध्ये आजीने सिंहाला तेथून पळवून लावले आहे. आजीचे वय ७० वर्षांपेक्षा जास्त दिसत असलं तरी तिचा आत्मविश्वास पाहून कोणालाच विश्वास बसत नाही की या वयातही आजी तिच्या धैर्याने एका सिंहाला पळवून लावले आहे.

वाचा: आमदाराच्या खास माणसाचे घाणेरडे चाळे, महिलेसोबत अश्लील डान्स, कॅमेऱ्यात कैद झालेला प्रकार व्हायरल!

वो भाई खतरनाक निकली दादी तो दादी ने शेर को,

डाँट कर भगा दिया 😂😜पॉवरफुल दादी ने तो कमाल कर दिया वाह दादी वाह। pic.twitter.com/aL8PEfqCWo

— JASIM PATHAN (@jasimpathan05)

खरं की AI व्हिडीओ?

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ तुम्हाला खरा वाटला तरी, खरं सत्य हे आहे की तो AI च्या मदतीने बनवला गेला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर @jasimpathan05 नावाच्या आयडीवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘ओ भाई खतरनाक आहे आजी. आजीने सिंहाला आरडून पळवले. आजीची तर कमाल आहे… वाह वाह आजी‘

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

फक्त ८ सेकंदाच्या या व्हिडीओला आत्तापर्यंत हजारो वेळा पाहिलं गेलं आहे, तर शेकडो लोकांनी व्हिडीओला लाईक केलं आहे आणि विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं आहे की, ‘हा व्हिडीओ एआयच्या माध्यमातून तयार केला असू शकतो. नाहीतर इतक्या वेळात सिंहाने म्हातारीवर चार वेळा हल्ला केला असता.’ तर दुसऱ्या युजरनेही अशीच काहीसी कमेंट केली आहे.‘सगळी एआयची कमाल आहे. नाही तर इतक्या वेळात सिंहाने चार लोकांवर हल्ला केला असता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.