ना राजा, नाही राष्ट्रप्रमुख, पण ही एकमेव व्यक्ती जगात कुठेही फिरू शकते, नाही लागत व्हिसा-पासपोर्ट
Tv9 Marathi October 27, 2025 06:45 AM

कोणत्याही देशात जायचे असेल तर पासपोर्ट आणि व्हिसा हा लागतोच. त्याशिवाय तुम्हाला दुसऱ्या देशात जाता येत नाही. अगदी कोणत्याही देशाचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपती वा पंतप्रधान असो त्याला ही एक खास पासपोर्ट हवा असतो. जपानचा सम्राट आणि राणी, ब्रिटनचा किंग यांना जगात विना पासपोर्ट, व्हिसा कुठे पण फिरता येते. अगदी तसेच या व्यक्तीला विना पासपोर्ट, व्हिसा जगात कुठे पण फिरता येते. कोण आहे ही व्यक्ती?

व्हॅटकिन सिटीचे पोप

ही खास सोय ज्या देशातील नागरिकाला मिळते, ती व्यक्ती व्हॅटकिन सिटी या छोट्या देशाची प्रमुख आणि कॅथेलिक ख्रिश्चनांचे प्रमुख, धर्मगुरु पोप हे आहेत. पोप फ्रान्सिस यांनी 50 हून अधिक देशांची यात्रा कोणत्याही व्हिसा वा पासपोर्ट विना केली आहे. पोप यांना जगात राजमान्यता आहे. त्यामुळे कोणत्याही पासपोर्टशिवाय ते कोणत्याही देशात जाऊ शकतात. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडू शकतात.

पोप यांचेकडे पासपोर्ट असतो का?

पोप यांच्याकडे व्हॅटकिन सिटीचा राजकीय पासपोर्ट असतो. त्याआधारे जगातील जवळपास सर्वच लोक त्यांना विना व्हिसा प्रवेश देतात. जेव्हा पोप एखाद्या देशात जातात तेव्हा आमंत्रित देश त्यांना विशेष सवलत देतो. पोप यांना कुठलाही व्हिसा दाखवावा लागत नाही. पण पोप येणार म्हटल्यावर अनेक देशात त्यांच्या सुरक्षेसाठी मोठा बंदोबस्त करावा लागतो. त्यांच्यासाठी खास नियम आणि सुरक्षा व्यवस्था करावी लागते. त्यासाठी नियमांचे सर्वांना पालन करावे लागते.

कोण आहेत पोप?

पोप हे व्हॅटकिन शहराचे प्रमुख, कॅथलिक धर्मगुरू आहेत. 1.3 अब्जाहून अधिक कॅथेलिक लोकांचे अध्यात्मिक नेता आहेत. कोणत्याही इतर देशाचा दौरा करताना त्यांना एक विशिष्ट राजकीय पाहुणा म्हणून दर्जा देण्यात येतो. त्यातंर्गत त्यांना कोणताही व्हिसा वा पासपोर्ट द्यावा लागत नाही. पोप कोणत्याही देशात त्यांच्या खासगी “शेफर्ड वन” या विमानाने जातात. यामध्ये आरामदायक बसण्याचे आसन, झोपण्यासाठी बर्थ आणि प्रार्थना करण्यासाठी एक खास जागा आहे. या खासगी विमानाने ते जगात कुठेही जाऊ शकतात. अशीच सुविधा जपानचे सम्राट आणि त्यांची पत्नी, ब्रिटनच्या राजाला मिळतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.