आरी वर्क केलेल्या ब्लाउजची अशी घ्या काळजी, होणार नाहीत खराब
Marathi October 28, 2025 09:25 AM

तुळशी विवाह झाल्यावर लग्नसराई सुरू होते. लग्न म्हटले की सर्वात आधी लक्ष जाते ते नवरा-नवरीच्या आउटफिटकडे. विशेष करून नवरीच्या कपड्यांकडे. हल्ली मुली साडीसोबत हेवी डिझायनर ब्लाउज घालणे पसंत करतात. सध्या ब्लाउजवर वेगवेगळ्या पॅटर्नचे वर्क करून मिळते. यात नाजूक धागा, मोती वर्क, मण्यांचे वर्क अशा विविध प्रकारचे वर्क केलेले असते.

सध्या यात आरी वर्क हा खूच चर्चिला जाणार प्रकार आहे. आरी वर्क या प्रकारात ब्लाउजनवर बारीक नाजूक गोल्डन मण्यांचे वर्क केले जाते. आरी वर्क करणे कठीण काम असल्याने या ब्लाउजसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात. एवढंच नव्हे तर ब्लाउजवर इतके महागडे वर्क करून घेतल्याने अशा ब्लाउजची तितकीच काळजी घ्यावी लागते.

धुण्याची पद्धत –

  • ब्लाउज धुण्यासाठी शॅम्पू आणि थंड पाण्याचा वापर करावा.
  • गरम पाणी वापरू नका, कारण त्यामुळे धागे खराब होऊ शकतात.

हेही वाचा – Dry Shampoo : पाणी न वापरता केस करा स्वच्छ, काय आहे ड्राय शॅम्पू?

  • डिटर्जंट वापरणार असाल तर सौम्य डिटर्जंटचा वापर करावा.
  • ब्लाउजला जास्त चोळू नका.
  • मशीन वॉश टाळा.

सुकवण्याची पद्धत –

  • ब्लाउज जास्त पिळू नका, कारण यामुळे वर्क खराब होऊ शकते.
  • ब्लाउज सुकवण्यासाठी त्याला एका स्वच्छ आणि सुक्या कपड्यावर ठेवून हलकेच दाबा. यामुळे जास्तीचे पाणी निघून जाईल.
  • ब्लाउज थेट उन्हात सुकवू नका, यामुळे त्याचा रंग फिका पडू शकतो.

ठेवण्याची पद्धत –

  • ब्लाउज ठेवताना व्यवस्थित घडी घालावी.
  • ब्लाउज एकमेकांवर ठेवू नका, यामुळे वर्क खराब होते.

ब्लाउजवर परफ्यूमचा वापर टाळावा –

आरी वर्क केलेल्या ब्लाउजवर परफ्युम डिओ वापरू नये. कारण यातील केमिक्लसमुळे गोल्डन मणी खराब होऊ शकतात.

हेही वाचा – Gel Nail Polish: जेल नेल पॉलिशचा नवा फॅशन ट्रेंड; जाणून घ्या सर्व काही

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.