Riteish Deshmukh: अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलियाची जोडी घराघरात पोहचली आहे. महाराष्ट्राची लाडकी सून म्हणून जेनिलियाला ओळखलं जातं. तीचं साधेपण चाहत्यांना प्रचंड भावतं. तसचं सोशल मीडियावर दोघेही नेहमीच सक्रीय असतात. अशातच आता इन्स्टाग्राम अकाऊंटवर जेनिलियाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रितेश-जेनिलियाचा मजेशीर अंदाज पहायला मिळालाय. सध्या त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सध्या दोघेही राजा शिवाजी सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. दोघांनीही यंदाची दिवाळी मुंबईतच साजरी केली. सोशल मीडियावर त्यांनी फोटो व्हिडिओ सुद्धा पोस्ट केले होते. यावेळी सणासुदीला लातूरला जाता आलं नसल्याची नाराजी सुद्धा व्यक्त केली. याच दरम्यान रितेश-जेनिलियाने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. तो चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
या व्हिडिओमध्ये रितेश रागात लिफ्टमधून बाहेर येताना पहायला मिळतोय. याचवेळी जेनिलियाला त्याचा धक्का लागतो. तेव्हा ती त्याला विचारते, एवढ्या रागात कुठे निघालास? त्यावर रितेश म्हणतो...टोमॅटो घेऊन आलेलो. पण सगळे खराब निघाल्याने आता परत रिटर्न करायला चाललो. बदलून आणतो. त्यावर जेनिलिया त्याला म्हणते...'मग विकत घेताना नीट बघायचे ना' त्यावर रितेश म्हणतो... 'नीट बघुन तर तुलाही आणलं होतं.'
View this post on InstagramA post shared by Genelia Deshmukh (@geneliad)
रितेशचं उत्तर ऐकताच दोघेही मोठ्यामोठ्याने हसतात. नेटकऱ्यांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला आहे. नेटकरी व्हिडिओवर कमेंट करत भाऊ-वहिनीची जोडी एक नंबर आहे अशा कमेंट्स करताना पहायला मिळताय. दोघांचे एक्स्प्रेशन पाहून नेटकऱ्यांनी त्यांचं कौतूक केलं आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बाबो...! क्रिती सनॉनचा बॉयफ्रेंड तिच्यापेक्षा 8 वर्षाने लहान, शेअर केले फोटो, नेटकरी म्हणाले...'क्युट जोडी'