Chief Justice of India भूषण गवई सेवानिवृत्त
सरन्यायाधीश भूषण गवई 23 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत असून, 24 नोव्हेंबर न्यायमूर्ती सूर्यकांत सरन्यायाधीशपदाची शपथ घेतील.
Chief Justice of India 53 वे सरन्यायाधीश
सूर्यकांत 53 वे सरन्यायाधीश ठरणार असून, त्यांचा कार्यकाळ 14 महिने राहणार आहे. 9 फेब्रुवारी 2027मध्ये ते सेवानिवृत्त होतील.
Chief Justice of India मध्यवर्गीय कुटुंब
न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1962 रोजी हरियाणामधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.Chief Justice of India
Chief Justice of India कायद्याची पदवी
1981 मध्ये हिसार इथल्या सरकारी महाविद्यालयातून बॅचलर, तर 1984 मध्ये रोहतक इथल्या महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली.
Chief Justice of India वकिलीला सुरुवात
हिसार जिल्हा न्यायालयात वकिलीची सुरुवात केली, यानंतर पंजाब अन् हरियाणा उच्च न्यायालयात वकिलीसाठी चंदीगडला गेले.
Chief Justice of India महाधिवक्ता
न्यायमूर्ती सूर्यकांत 7 जुलै 2000 रोजी हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता बनले. मार्च 2001 मध्ये त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त झाले.
Chief Justice of India उच्च न्यायालयात न्यायाधीश
9 जानेवारी 2004 रोजी, न्यायमूर्ती सूर्यकांत यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.
Chief Justice of India 'सर्वोच्च'मध्ये बढती
5 ऑक्टोबर 2018 रोजी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, 24 मे 2019 रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली.
Chief Justice of India सेवा समिती अध्यक्ष
12 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर सेवा समितीचे अध्यक्ष देखील आहेत.
NEXT : नोकरी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी... येथे क्लिक करा :