संगमनेर: ''...अन् थेट आमदारच आपल्या भेटीला आले!'' या आश्चर्यचकित भावनेने लोहारे-मिरपूर (ता. संगमनेर) परिसरातील शेतकरी अक्षरशः भारावून गेले. रविवारी भरविण्यात येणाऱ्या आठवडे बाजाराला आमदार अमोल खताळ यांनी अचानक भेट दिली आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.
Barshi Crime: 'तणनाशक फवारणीप्रकरणी गुन्हा दाखल'; पंचनाम्यानुसार कोरफळेतील द्राक्ष बागेचे ११ लाखांचे नुकसानया भेटीदरम्यान आमदार खताळ यांनी बाजारातील विविध स्टॉलना भेट देत शेतकऱ्यांकडून त्यांच्या शेतीमालाविषयी, दरांविषयी आणि बाजारपेठेतील अडचणींबाबत सविस्तर माहिती घेतली. शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न ऐकून त्यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती दिली आणि ''शेतकऱ्यांचा आत्मविश्वास व मेहनतीची जिद्द पाहून अभिमान वाटतो,'' असे सांगितले.
लोहारे-मिरपूर येथे दर रविवारी हा आठवडे बाजार भरविला जात आहे. परिसरातील शेतकरी आपला शेतीमाल थेट ग्राहकांना विक्रीसाठी आणतात. गावातच विक्रीची संधी मिळाल्याने शेतकऱ्यांना वाहतूक खर्च आणि वेळेचा अपव्यय टळत असून, आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार खताळ यांच्या भेटीमुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले. शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्च कमी आणि उत्पन्न वाढवावे. शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Organic Banana Success : सोनईची केळी 'दुबई'च्या बाजारपेठेत; भुसारी परिवाराचे कौतुक; सेंद्रिय शेतीने अधिक उत्पन्नाची गोडीस्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी आमदार खताळ यांच्या या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले. ''आमदार स्वतः येऊन आमच्या समस्या जाणून घेत आहेत, ही मोठी गोष्ट आहे,'' असे मत अनेकांनी व्यक्त केले. या प्रसंगी आमदार अमोल खताळ यांच्यासमवेत गणपत मुर्तडक, मोहन मुर्तडक, प्रियंका मुर्तडक, राजेंद्र रणमाळे, दत्तू रणमाळे, शरद मुर्तडक, ज्ञानेश्वर मुर्तडक, वैभव मुर्तडक, कुंदन फिटर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.