Mumbai News: मेट्रो स्थानकांच्या नाव बदलाला विरोध, काँग्रेसने पुकारलं आंदोलन; वाचा नेमके प्रकरण
esakal October 29, 2025 01:45 PM

मुंबई : महायुती सरकारने मेट्रो ३ ॲक्वा लाइन मार्गावरील स्थानकांचे व्यापारी कंपन्यांच्या नावाने नामकरण करण्याचा निर्णय घेतल्याच्या विरोधात आज (ता. २८) मुंबई काँग्रेसतर्फे दादर येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिराजवळ जोरदार आंदोलन करण्यात आले.

महायुतीसरकारने नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रोस्थानकाचे कोटक-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सिद्धिविनायक स्थानकाचे आयसीआयसीआय लोम्बार्ड-सिद्धिविनायक, महालक्ष्मी स्थानकाचे एचडीएफसी लाइफ महालक्ष्मी, आचार्य अत्रे चौक स्थानकाचे निप्पॉन एमएफ-आचार्य अत्रे चौक असे नामकरण केले आहे.

Navi Mumbai News: पदपथांचा ‘राजा’ बेहाल! निवडणुकांमुळे लोकप्रतिनिधींचे अतिक्रमण; जाहिरातबाजीसाठी अतिक्रमण

या निर्णयाविरोधात मुंबई काँग्रेसअध्यक्षा खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. इतिहासातील, सांस्कृतिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांना कॉर्पोरेट कंपन्यांची नावे देणे म्हणजे मुंबईच्या अस्मितेचा अपमान आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.

या आंदोलनात ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केतन शहा, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलकांनी सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने हा निर्णय मागे घेऊन स्थानकांची मूळ ओळख जपावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

रेल्वे स्टेशनच्या बोर्डांवर उर्दू भाषेत नाव ठेवण्यास भाजपचा विरोध

गेल्या आठवड्यात, सरकारने औरंगाबाद रेल्वे स्टेशनचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे अधिकृतपणे अधिसूचना जारी केली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या नामफलकांवर उर्दू भाषेतही नाव लिहिल्यामुळे उर्दू लिपी काढून टाकण्याची मागणी भाजप आमदार संजय केणेकर यांनी केली.

Mumbai News: शीव येथील बंद सायकल मार्गिकेवरील कचरा हटवा, उच्च न्यायालयाचे आदेश

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य केणेकर यांनी फलकावरील उर्दू भाषेच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की, “अधिसूचनेत फक्त हिंदी, इंग्रजी आणि मराठीचा उल्लेख असताना उर्दू का वापरला जात आहे? “अधिकारी मुघलांशी संबंधित होते का? उर्दूमध्ये नाव लिहिणे हा आपल्यावर निजामी भाषा लादण्याचा प्रयत्न आहे. आपण आधीच अशा राज्यकर्त्यांना सामोरे गेलो आहोत ज्यांनी आपला इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला आहे.” अशी टीका त्यांनी यावेळी केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.