जेवणानंतर लगेच झोपताय? या सवयीमुळे वाढतो आजारांचा धोका
esakal October 29, 2025 04:45 PM
रात्रीचे जेवण: आरोग्याची गुरुकिल्ली

रात्रीचे जेवण (Dinner) हे केवळ भूक शांत करत नाही, तर पचनसंस्था आणि ऊर्जेची पातळी राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

रात्री उशिरा खाण्याचे धोके

तज्ज्ञांनुसार, रात्री उशिरा जेवण केल्यास अनेक गंभीर आरोग्य समस्या (Health Problems) उद्भवू शकतात.

झोपण्यापूर्वीची वेळ

रात्रीचे जेवण नेहमी झोपण्यापूर्वी किमान २ ते ३ तास आधी पूर्ण झालेले असावे, हे शरीरासाठी महत्त्वाचे आहे.

धोक्याची घंटा: वजन वाढणे

उशिरा खाल्ल्याने कॅलरी बर्न होत नाहीत आणि शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊन वजन वाढू शकते.

गंभीर आजारांचा धोका

उशिरा जेवण करणाऱ्यांना मधुमेह (Diabetes) आणि हृदयविकाराचा (Heart Disease) धोका जास्त असतो, असे अनेक अभ्यासातून दिसून आले आहे.

झोपेवर परिणाम

रात्री उशिरा जेवल्याने पचनात अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे झोपमोड आणि अनिद्रा (Insomnia) होऊ शकते.

उपाय आणि फायदे

लवकर जेवण करून थोडा वेळ चालल्यास पचनशक्ती सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर उत्साह टिकून राहतो.

Bone Health & Calcium Sources

कॅल्शियमची कमतरता, हाडं ठिसूळ! ऑस्टियोपोरोसिसचा धोका टाळण्यासाठी रोज खा 'हे' 1 सुपरफूड! येथे क्लिक करा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.