Phaltan Doctor Case: प्रशांत बनकरचं घर, फोटो अन् लॉजवरचा संवाद... डॉक्टर महिलेच्या आत्महत्येपूर्वी काय काय घडलं?
Saam TV October 29, 2025 07:45 PM
Summary:
  • साताऱ्यातील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट

  • आत्महत्येपूर्वी डॉक्टर आणि आरोपी प्रशांत बनकरमध्ये भांडण

  • भांडणानंतर डॉक्टरने प्रशांत बनकरचे घर सोडले आणि लॉजवर गेली

  • लॉजवर डॉक्टरने गळफास घेत आयुष्य संपवलं

साताऱ्यातल्या फलटण शासकीय रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर महिलाने आत्महत्या केली होती. या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २८ वर्षीय डॉक्टरने या प्रकरणात अटक असलेल्या आरोपी प्रशांत बनकर याच्या घरी दिवाळी साजरी केली होती. याचदरम्यान आरोपी आणि डॉक्टर यांच्यामध्ये वाद झाला. या वादानंतर डॉक्टर घर सोडून निघून गेली. त्यानंतर एका हॉटेलवर जाऊन या महिला डॉक्टरने आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली.

राज्य महिला आरोग्याच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरयांनी सोमवारी फलटण शासकीय रुग्णालयाला भेट देत या प्रकरणाविषयीची सर्व माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या प्रकरणाविषयीची माहिती दिली. यावेळी रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, 'कॉल डिटेल रेकॉर्डवरून असे दिसून येते की ती डॉक्टर महिला प्रशांत बनकरच्या संपर्कात होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ती बनकरच्या घरी गेली होती. चुकीच्या पद्धतीने काढलेल्या फोटोवरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर, डॉक्टर महिला प्रशांत बनकरचे घर सोडून निघून गेली. प्रशांतच्या वडिलांनी तिला घरी परत आणले. पण ती पुन्हा एका लॉजमध्ये राहायला गेली.'

Phaltan Doctor Case: ...अन् सगळ्या सुंदर स्वप्नांचा चुराडा झाला, डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर किरण मानेंनी सरकारला धरले धारेवर

त्यांनी पुढे असेही सांगितले की, 'डॉक्टरने आत्महत्येपूर्वी प्रशांत बनकरला मेसेज पाठवले होते. ज्यात तिने आत्महत्या करेल असे देखील लिहिले होते. सुरुवातीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून डॉक्टरने गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. महिला डॉक्टर आणि दोन्ही आरोपींचे कॉल रेकॉर्ड काढण्यात आले. डॉक्टर महिला दोन्ही आरोपींच्या संपर्कात होती. मार्चपर्यंत ती पीएसआय गोपाल बदनेच्या संपर्कात होती. त्यानंतर त्यांच्यात काहीच संवाद झाला नाही. त्यानंतर महिला डॉक्टर प्रशांत बनकरच्या संपर्कात आली होती.'

Phaltan News : फटलण डॉक्टर अत्याचार प्रकरणातील आरोपी PSI बदनेचा जुना व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, साताऱ्याच्या फलटण शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकारीने फलटणमधील एका लॉजमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. ही महिला डॉक्टर मूळची बीडची होती. ती आरोपी प्रशांतच्या घरी भांड्याने राहत होती. या डॉक्टरने आत्महत्येपूर्वी हातावर सुसाइड नोट लिहिली होती. यामध्ये तिने पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांवर गंभीर आरोप केले. त्यांनी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला त्याचसोबत ४ वेळा बलात्कार केल्याचे सुसाइड नोटमध्ये लिहिले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी बदने आणि बनकर या दोघांना अटक केली. सध्या दोन्ही आरोपी पोलिस कोठडीत असून पोलिस दोघांची चौकशी करत आहेत.

Phaltan Doctor Case: पुरावे नष्ट करून सरेंडर, SIT मार्फत चौकशी करा, फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात गावकरी रस्त्यावर
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.