वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील बाद फेरीचा प्रवास सुरु झाला आहे. पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आले आहेत. इंग्लंडने साखळी फेरीत दक्षिण अफ्रिकेचा दारूण पराभव केला होता. त्यामुळे या सामन्यात इंग्लंडचं पारडं जड आहे. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिकेला साखळी फेरीच्या सामन्यातील चुका दुरूस्त करून पुढे जावं लागणार आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल या सामन्यात इंग्लंडच्या बाजूने लागला आणि कर्णधार नॅट स्कायव्हर ब्रंटने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. साखळी फेरीतील सामन्यातही इंग्लंडने अशीच रणनिती अवलंबली होती. इंग्लंडची कर्णधार नॅट स्कायव्हर ब्रंट म्हणाली की, ‘आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची आहे. चांगली गोलंदाजी करत त्यांच्यावर दबाव आणायचा आहे. त्यानंतर संध्याकाळच्या प्रकाशात त्याचा पाठलाग करायचा आहे. आमचा संघही तोच आहे. ती थोडीशी वेदना सहन करत खेळेल, पण ती पुढे जाण्यासाठी उत्सुक असेल. प्रक्रियेवर आणि तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवा आणि प्रसंगाचा आनंद घ्या.’
दक्षिण अफ्रिकेची कर्णधार, टआम्हीही प्रथम गोलंदाजी करण्याचा विचार करत होतो. आज आम्ही एक अतिरिक्त फलंदाज खेळवत आहोत. क्लासऐवजी बॉशचा संघात समावेश आहे. आज आपण प्रथम फलंदाजी चांगली करू शकू अशी आशा आहे. दिवसाच्या शेवटी, हे सर्व जिंकण्याबद्दल आहे.’
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन : एमी जोन्स (विकेटकीपर), टॅमी ब्यूमोंट, हीदर नाइट, डॅनिएल वायट-हॉज, नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), सोफिया डंकली, एलिस कॅप्सी, शार्लोट डीन, सोफी एक्लेस्टोन, लिन्सी स्मिथ, लॉरेन बेल
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन: लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, स्युने लुस, ॲनेरी डेर्कसेन, ॲनेके बॉश, मारिजाने कॅप, सिनालो जाफ्ता (डब्ल्यू), क्लो ट्रायॉन, नदिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा