 
            Entertainment News : बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी सध्या गुगलवर ट्रेंड करते आहे. नुकताच तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती नवरीच्या वेषात दिसतेय त्यावरून ती 52 व्या वर्षी दुसरं लग्न करत आहे अशा चर्चा आहेत. पण काय आहे त्यामागील कारण जाणून घेऊया.
या व्हिडिओमध्ये महिमाबरोबर अभिनेते संजय मिश्राही दिसत आहेत. दोघांनी एकत्र कॅमेरासाठी पोझ दिल्या आहेत. त्यानंतर महिमा पापाराझींना म्हणाली "लग्नाला तर आला नाहीत तरीही मिठाई खाऊन जा." हे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.
View this post on InstagramA post shared by One100 News (@one100newsmedia)
खरं सांगायचं तर महिमा चौधरी आणि संजय मिश्रा यांचं लग्न झालं नाहीये तर त्यांचा आगामी सिनेमा दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी याच्या प्रोमोशनसाठी केलेला हा स्टंट आहे. अभिनेत्री यासाठी नव्या नवरीप्रमाणे नटली होती.तर संजय मिश्रा एका वराच्या वेषात दिसत आहेत. अजून या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली नाहीये.
काही दिवसांपूर्वीच महिमाने या सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर केलं. जे सोशल मीडियावर चर्चेत होतं. महिमा आणि संजय यांच्याबरोबरच व्योम आणि पलक लालवानी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
परदेस, धडकन यांसारख्या सिनेमांमुळे महिमा प्रसिद्ध झाली. तर तिने अखेरचं नेटफ्लिक्समधील नादानीयां या सिनेमात तिने काम केलं होतं. ख़ुशी कपूर, सुनील शेट्टी आणि इतर कलाकारांबरोबर काम केलं होतं. तर संजय मिश्रा यांनी अखेरचं हीर एक्स्प्रेस या सिनेमात काम केलं होतं.
"आमचा ट्रेलर बघू नका" रिलीजपूर्वीच गोंधळ सिनेमाच्या दिग्दर्शकाची कोड्यात टाकणारी पोस्ट ! कारण सांगत म्हणाला..