Famous Singer: चाहती सेल्फीसाठी गेली, गायकाने आधी मिठी मारली नंतर केलं लिपलॉक; VIDEO होतोय तुफान व्हायरल
Saam TV October 31, 2025 03:45 PM

प्रसिद्ध गायकाचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओत गायक महिला चाहतीला किस करताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

चाहते आपल्या आवडत्या कलाकाराला पाहण्यासाठी, त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी कायम प्रयत्नात असतात. ज्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. सध्या तसाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक महिला चाहती एका गायकासोबत सेल्फी काढायला गेली आणि त्या दोघांनी किस केली. या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

View this post on Instagram

A post shared by Fan Page (@enri75que_aze)

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला चाहती गायकासोबत सेल्फी काढायला आली. तेव्हा गायकाने तिच्या गालावर किस केले. त्यानंतर दोघांचा कंट्रोल सुटला आणि त्यांनी लिपलॉक केला. गायकाने चाहतील घट्ट मिठीमारली. तो काही वेळ तिला सोडत नव्हता. त्यांच्या आजूबाजूला अनेक गार्डस होते. कालांतराने दोघे भानावर आले आणि गायक स्टेजवर गेला. या सगळ्यानंतर चाहती भलतीच खुश पाहायला मिळाली.

व्हायरल व्हिडीओमधील प्रसिद्ध गायकाचेनाव Enrique Iglesias असे आहे. तो एक स्पॅनिश गायक, पॉप स्टार आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 18.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. Enrique Iglesias भारतात आला आहे. त्याचे काल (30 ऑक्टोबर)ला मुंबईवांद्रे बीकेसी येथे लाईव्ह परफॉर्म शोपार पडला. या शोला मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली.

View this post on Instagram

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

मीडिया रिपोर्टनुसार, Enrique Iglesias हा व्हिडीओ जुना आहे. जो आता पुन्हा व्हायरल होत आहे. यापूर्वी झालेल्या एका लाईव्ह परफॉर्मन्स वेळ हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. चाहते तुफान कमेंट्स करत आहेत. अलिकडेच असाच महिला चाहतील किस करतानाचा प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

सलमान पक्षपात करतो, Bigg Bossसाठी 200 कोटी घेतो? निर्मात्यांनी केला मोठा खुलासा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.