कोणत्या दिशेला रोप लावणे अशुभ मानले जाते? जाणून घ्या 'हे' वास्तु नियम
Tv9 Marathi November 02, 2025 05:45 PM

वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशेला विशेष महत्त्व आहे. ज्याप्रमाणे घराची उभारताना आपण स्वयंपाकघर, देवघर किंवा बेडरूम हे योग्य दिशेला बांधतो कारण यामुळे आपल्या घरात व घरातील व्यक्तींवर यांचा शुभ किंवा अशुभ परिणाम होत असतो, त्याचप्रमाणे घरात ज्या दिशेला रोपं लावली जातात त्या दिशेमुळे जीवनात सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा देखील संक्रमित होते. जर तुम्ही घरामध्ये चुकीच्या दिशेने एखादं रोप लावलं तर शुभ परिणामांऐवजी त्यांचे अशुभ परिणाम तुमच्या जीवनावर होऊ शकतात. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात कोणत्या दिशेने रोपं किंवा झाडं लावणे अशुभ मानले जाते आणि कोणत्या दिशेला शुभ मानली जातात.

वास्तुशास्त्रात झाडांच महत्त्व

घरात रोपं लावण्याची परंपरा प्राचीन काळापासून आहे. झाडं केवळ आपल्या घरातील वातावरण शुद्ध करत नाहीत तर सकारात्मक ऊर्जा देखील देतात. तुळशी, मनी प्लांट आणि बांबूची छोटी रोपं यासारख्या वनस्पतींना संपत्ती, सौभाग्य आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते. मात्र जर ही झाडं चुकीच्या दिशेने घरामध्ये ठेवली तर त्यांचे शुभ परिणाम कमी होतात.

या दिशांना झाडे लावणे मानली जातात अशुभ

दक्षिण दिशा

वास्तुनुसार दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. या दिशेने रोपं किंवा झाडं लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. त्याचा कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

विशेषत: निवडुंग, गुलाबाची झाडं किंवा सुकलेली झाडे दक्षिण दिशेला ठेवू नयेत.

पश्चिम दिशा

पश्चिमेला सूर्यास्ताची दिशा असते. या दिशेला रोपं लावल्याने घरात आळस, थकवा आणि मानसिक ताण वाढू शकतो.

जर तुम्हाला या दिशेने झाडे लावायची असतील तर खूप मर्यादित संख्येने आणि कमी उंचीची झाडे ठेवा.

ईशान्य दिशा

हा कोपरा देव आणि जल तत्वाचे क्षेत्र मानला जातो. तर ईशान्य दिशेला जड वस्तू किंवा मोठी झाडे ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतात.

ईशान्य कोपऱ्यात मोठी झाडे, रोपं किंवा कुंड्या ठेवल्याने घरात शांती आणि आनंदात बाधा येते आणि आर्थिक प्रगती थांबते.

या दिशांना झाड व रोपं लावणे शुभ आहे

उत्तर दिशा

उत्तर दिशा ही कुबेराची म्हणजेच धनाची देवता यांची दिशा मानली जाते. येथे मनी प्लांट, तुळस, फर्न किंवा इतर हिरवीगार झाडे लावल्याने संपत्ती आणि सौभाग्य वाढते.

पूर्व दिशा

ही दिशा सूर्याच्या उर्जेने भरलेली आहे. या दिशेला रोपं लावल्याने घरात ताजेपणा, आरोग्य आणि समृद्धी येते.

सकाळचा सूर्यप्रकाश रोपांना व झाडांना ताजेतवाने आणि हिरवेगार ठेवतो आणि ही दिशा मानसिक शांतीसाठी देखील चांगली मानली जाते.

ईशान्येला फक्त लहान रोपं ठेवा

तुळशीचे रोप पवित्र मानले जाते आणि ते पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.

काटेरी झाडे आणि सुकलेली झाडे

निवडुंग, बाभूळ किंवा इतर कोणतेही काटेरी रोपं घरात ठेवू नये. यामुळे नातेसंबंधांमध्ये तणाव आणि मानसिक अशांतता येते.

घरामध्ये सुकलेल्या किंवा कोमेजलेल्या वनस्पती ठेवणे देखील अशुभ मानल्या जातात. ते नकारात्मकता पसरवतात म्हणून अशी रोपं व झाडं ताबडतोब काढून टाकावेत.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.