पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात रविवारी पहाटे भीषण अपघात झाला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. बंडर्गाडन परिसरात एका भरधाव कारने मेट्रोच्या खांबाला धडक दिली यात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरक्ष: चेंदामेंदा झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हृतिक भंडारे यश भंडारे असे मृतांची नावे असून गाडीमध्ये बियरच्या बॉटल असल्याने दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून गाडीचा पंचनामा सुरू आहे. या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.