ग्रँड बर्थडे सेलिब्रेशनचा बॉलिवूड प्रथेवर 'या' स्टारकिडने मारली फुल्ली ! कारण सांगताना म्हणाली..
esakal November 03, 2025 02:45 PM

Bollywood News : बॉलिवूडची नवोदित स्टार शनाया कपूर या वर्षी तिचा वाढदिवस अगदी शांत आणि साध्या पद्धतीने साजरा करत आहे. आगामी चित्रपटांच्या गडबडीतून थोडा ब्रेक घेत, ती यावेळी फक्त जवळच्या मित्र-परिवारासोबत चांगला वेळ घालवणार आहे.

शनाया हसत म्हणाली की, “मला माझ्या बर्थडेला फार धूमधडाका करायला आवडत नाही. आपल्या माणसांसोबत छान डिनर, गप्पा आणि स्वादिष्ट जेवण – एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. दिवस निवांत, हसरा आणि मनाला आनंद देणारा असावा असंच मला वाटतं.”

सलग शूटिंगनंतर तिचा हा साधा सेलिब्रेशन तिच्या स्वभावासारखाच आहे – एलिगंट पण ईझीगोइंग. या वर्षीचा दिवस तिच्यासाठी राहणार आहे फक्त आपुलकी, हास्य आणि गोड क्षणांचा.

वर्कफ्रंटवर शनायासाठी पुढची काही महिने खूप खास आहेत. आंखों की गुस्ताखियांमधून डेब्यू केल्यानंतर ती लवकरच तू या मैं आणि जेसी या चित्रपटांत दिसणार आहे. यानंतर एका मोठ्या फ्रँचायझीच्या सीरिजमध्येही तिचं नाव चर्चेत आहे. प्रत्येक प्रोजेक्टसोबत शनाया नव्या रंगात झळकते आहे – बॉलिवूडच्या पुढच्या उजळणाऱ्या तारकांपैकी एक म्हणून तिची ओळख अधिक मजबूत होत चालली आहे.

View this post on Instagram

A post shared by Shanaya Kapoor (@shanayakapoor02)

काही महिन्यांपूर्वीच तिचा आँखो की गुस्ताखीयां या सिनेमातून पदार्पण केलं. विक्रांत मेस्सीबरोबर तिने काम केलं होत. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं.

अंगात ताप अन चालताही येईना, बिग बॉस 19 मधून प्रणित मोरे बाहेर ! एव्हिक्शन होत नाही तोच कमबॅकच्या चर्चा
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.