नाशिक: राज्य निवडणूक आयोगाच्या आरक्षण निश्चितीच्या नव्या नियमानुसार इतर मागास प्रवर्गातील एका जागेत घट होणार आहे, तर सर्वसाधारण जागेत वाढ होणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून आरक्षित जागांचा अहवाल सोमवारी (ता. ३) आयोगाला सादर केला जाणार आहे.
महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात प्रभागनिहाय हद्द निश्चित करण्यात आली. त्यानंतर प्रभाग सदस्य संख्या निश्चित झाली. त्यानुसार ३१ प्रभाग निश्चित करण्यात आली, त्यात २९ प्रभाग चार सदस्यांचे तर प्रभाग क्रमांक १५ व १९ प्रत्येकी तीन सदस्यांचे आहेत. आता प्रभागनिहाय मतदार याद्यांचे विभाजन सुरू करण्यात आले आहे. ५ नोव्हेंबरपर्यंत प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. पुढील टप्प्यात आरक्षण काढले जाणार आहे.
दोन डिसेंबरला अंतिम आरक्षण राजपत्रात जाहीर करावे लागणार आहे. दरम्यान आरक्षण काढताना नव्या नियमानुसार आरक्षण निश्चित केले जाणार आहे. त्यात प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याची पध्दत नियम २०२५ मधील नियम क्रमांक ५ मध्ये आरक्षण पद्धती निश्चित करण्यात आली आहे.
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा वाटप करताना प्रत्येक प्रभागात नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाची एक किंवा अधिक जागा वाटप करण्यात येईल. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांची गणना करताना अपूर्णांक आल्यास तो दुर्लक्षित करावा, असा नियम आहे. महापालिकेत जागांची गणना करताना संख्या अपुर्णांकात येत असल्याने शेवटची एक जागा कमी होणार आहे.
Pune News : कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात निवडणूक तयारीत नागरी समस्यांकडे दुर्लक्ष; नागरिकांमध्ये नाराजीत्यानुसार इतर मागास प्रवर्गाकरिता आता ३३ ऐवजी ३२ जागा राखीव राहतील. या प्रवर्गाची एक जागा घटून जागा सर्वसाधारण खुल्या गटासाठी उपलब्ध होईल. आरक्षित जागांची संख्या निश्चित करून तीन नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे. आरक्षण सोडतीची जाहीर सूचना ८ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाईल. १० नोव्हेंबरला आरक्षण सोडत काढली जाणार आहे. ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडतीचा निकाल आयोगाच्या मान्यतेसाठी पाठविला जाईल. २४ नोव्हेंबरपर्यंत आरक्षणावर हरकती व सूचना मांडता येणार आहे.