रायगड जिल्ह्यातील महाड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाड शहर प्रमुखांवर हल्ला करण्यात आला आहे. दुकानात शिरून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात युट्युब चॅनलला मुलाखत दिली होती. याच मुलाखतीच्या रागातून मनसे नेत्यावर हल्ला करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मनसेचे महाड शहर प्रमुख पंकज उमासरे यांनी काही दिवसांपूर्वी एका युट्युब चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांच्याविरोधात भाष्य केलं होतं. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी पंकज उमासरे यांच्यावर हल्ला केला.
आधी भावाचा खून, नंतर वहिनीवर बलात्कार करून पोटावर लाथ मारली, भ्रूण गर्भाशयाच्या बाहेर येताच मृत्यूउमासरे यांच्या चवदार तळे येथील दुकानात शिरून आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीत पंकज उमासरे यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. त्यांना तातडीने रूग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली.
नाशिकमध्ये राजकीय भूकंप! दोन बड्या नेत्यांची शरद पवार गटातून हकालपट्टी, भाजपचं कमळ हाती घेण्याच्या तयारीतपोलिसांनी उमासरे यांच्यावर मुलाखतीच्या रागातून मारहाण झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली असून, सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.