INDW vs SAW Final Toss : वर्ल्ड कप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, टीम इंडियाची बॅटिंग, प्लेइंग ईलेव्हनबाबत असा निर्णय
Tv9 Marathi November 03, 2025 07:45 AM

आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील महाअंतिम सामन्यातही यजमान टीम इंडिया विरोधात नाणेफेकीचा निकाल लागला आहे. स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहचणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला आहे. या सामन्याला नियोजित वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र पावसाच्या विघ्नामुळे तब्बल 92 मिनिटांच्या विलंबाने नाणेफेक झाली. दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन लॉरा वोल्वार्ड हीने टॉस जिंकून भारताला फलंदाजीची संधी दिली आहे. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये होत आहे.

अनचेंज प्लेइंग ईलेव्हन

दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडियाने अंतिम सामन्यात सारखाच निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. दोन्ही संघांनी आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे.

सामन्याला 2 तास विलंबाने सुरुवात

4 वाजून 32 मिनिटांनी नाणेफेक झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता सामन्यनाला सुरुवात होणार आहे. अर्थात पावसामुळे 2 तासांचा खेळ व्यर्थ घालवला. मात्र त्यानंतरही ओव्हर कमी करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे एकूण 50 ओव्हरचा खेळ होणार आहे.

साखळी फेरीनंतर पुन्हा आमनासामना

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्याआधी साखळी फेरीत आमनेसामने आले होते. उभयसंघात साखळी फेरीतील सामना हा 9 ऑक्टोबरला खेळवण्यात आला होता. तेव्हा दक्षिण आफ्रिकेने भारतावर 3 विकेट्सने मात केली होती. त्यामुळे आता भारताकडे त्या पराभवाचा हिशोब करण्याची संधी आहे.

क्रिकेट विश्वाला मिळणार नवा विजेता

दरम्यान क्रिकेट विश्वाला यंदा नवा वर्ल्ड कप विजेता संघ मिळणार असल्याचं निश्चित आहे. तब्बल 25 वर्षांनंतर पहिल्यादा 2 वेगवेगळे संघ वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचले आहेत. याआधी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या 3 संघांनीच वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावली होती. मात्र आता 25 वर्षांनी इतिहास बदलणार आहे. त्यामुळे टीम इंडिया स्पर्धेच्या इतिहासातील तिसऱ्या अंतिम फेरीत विजय मिळवत वर्ल्ड कप मिळवणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे.

 

दक्षिण आफ्रिका वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : लॉरा वोल्वार्ड (कॅप्टन), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), ॲनेरी डेर्कसेन, क्लो ट्रायॉन, नदिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका आणि नॉनकुलुलेको मलाबा.

टीम इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : शफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी आणि रेणुका सिंग ठाकूर.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.