घरातील वातावरण सुंगध, फ्रेश राहावे यासाठी रुम फ्रेशनर वापरण्यात येतो. काहीजण घर सजवण्यासाठी सुंगधित मेणबत्यांच्या वापर करतात. पण, तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल या वस्तूंचा वापर करणे आजाराला निमंत्रण देणारे ठरू शकते. या रूम फ्रेशनर्स, परफ्यूम, कॉस्मेटिक्स किंवा अगदी सुगंधित मेणबत्त्या यासारख्या विविध प्रकारच्या सुगंधित उत्पादनांमध्ये जवळपास 3000 हून अधिक केमिकल असतात. या केमिकलमुळे फक्त श्वसनाचे नाही अनेक आजार होण्याचा धोका असतो. आज आपण जाणून घेऊयात रूम फ्रेशनरमुळे कोणते आजार होण्याचा धोका आहे.
श्वसनाचे आजार –
रूम फ्रेशनरमधील केमिकल्समुळे दम्यासारखे श्वसनाचे आजार होऊ शकतात आणि फुफ्फुसांच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.
त्वचेची ऍलर्जी –
त्वचा संवदेनशील असल्यास केमिकल्सयुक्त रूम फ्रेशनरमुळे त्वचेची ऍलर्जी होऊ शकते.
हेही वाचा – Mental Health Tips: ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डोक्यात येतात नको ते विचार
डोकेदुखी –
काही व्यक्तींना तीव्र वास आल्यावर डोकेदुखीचा त्रास असतो. अशा व्यक्तींना रूम फ्रेशनरमुळे मळमळ, डोकेदुखी आणि चक्कर येऊ शकते.
हवेच्या गुणवत्तेवर परिणाम –
रूम फ्रेशनर हवेतीत प्रदुषकांचे प्रमाण वाढवतात, ज्यामुळे घरातील हवेची गुणवत्ता खराब होते.
मेंदूवर परिणाम –
काही अभ्यासांनुसार यातील केमिकल्स मेंदूच्या पेशींवरही परिणाम करू शकतात.
डोळ्यांवर परिणाम –
रूम फ्रेशनरमुळे डोळे, घसा, फुफ्फुसात जळजळ होऊ शकते. जास्त वापर केल्यास लिव्हर आणि किडनीवर परिणाम होऊ शकतो.
पाळीव प्राण्यांनाही धोका –
रूम फ्रेशनरमुळे पाळीव प्राण्यांनाही त्रास होतो. श्वास घेण्यास, शिंक येऊ शकते.
सुगंधासाठी नैसर्गिक उपाय –
हेही वाचा – धूम्रपान सोडण्यासाठी ‘हर्बल सिगारेट’ ओढता? सावधान! हा पर्यायही आरोग्यासाठी तितकाच घातक