टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. उभसंघातील पहिला सामना हा पावसामुळे वाया गेला. तर भारताला दुसऱ्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी 31 ऑक्टोबरला भारताचा पराभव करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. भारताच्या 9 फलंदाजांना या सामन्यात दुहेरी आकडाही गाठता आला नाही. फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव याने तिसऱ्या टी 20I सामन्यात मोठा निर्णय घेतला आहे.
तिघांचा पत्ता कटउभयसंघातील तिसरा सामना हा होबार्टमध्ये आयोजित करण्यात आला. सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी सव्वा 1 वाजता टॉस झाला. अनेक सामन्यांच्या प्रतिक्षेनंतर भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. सूर्याने बॉलिंगचा निर्णय घेतला. तसेच सूर्याने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकूण 3 बदल केले आहेत. सूर्याने विकेटकीपर, 1 फास्टर बॉलर आणि 1 फिरकीपटूला प्लेइंग ईलेव्हनमधून डच्चू दिला आहे.
कुणाला कुणाच्या जागी संधी?सूर्याने विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन, वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि फिरकीपटू कुलदीप यादव या तिघांना डच्चू दिला आहे. तर जितेश शर्मा, अर्शदीप सिंह आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी दिली आहे. तर ऑस्ट्रेलिया टीमनेही 1 बदल केला आहे. जोश हेझलवूड याच्या जागी सीन एबोट याला संधी दिली आहे. हेझलवूड याचा पहिल्या 2 सामन्यांत समावेश करण्यात आला होता.
भारताच्या बाजूने नाणफेकीचा कौल
🚨 Toss 🚨 #TeamIndia have won the toss and elected to bowl first.
Updates ▶ https://t.co/X5xeZ0Mc5a #AUSvIND pic.twitter.com/Q3NtpVAer5
— BCCI (@BCCI)
ऑस्ट्रेलिया टीम प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), टीम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू शॉर्ट, शॉन अॅबॉट, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस आणि मॅथ्यू कुहनेमन.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.