धुळे तालुका पोलिसांनी १०० आणि ५०० रुपयांच्या बनावट नोटांसह एका संशयिताला जेरबंद केले.
पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली
आरोपी हा विदर्भातील असल्याचे उघडकीस आले असून, मोठे बनावट नोटांचे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता तपासात व्यक्त.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ही घटना घडल्याने प्रशासन सतर्क झाले असून जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
धुळ्यात शंभर व पाचशे रुपयांच्या बनावट नोटांसह एका संशयिताच्या धुळे तालुका पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर या बनावट नोटांच्या कारवाईमुळे धुळे शहरासह जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे,
Satyacha Morcha: सत्याच्या मोर्चामध्ये राज ठाकरेंनी दाखवला पुराव्याचा ढिगारा; विरोधकांचा आयोगावर हल्लाबोल, जाणून घ्या कोण काय म्हणाले?धुळे तालुका पोलिसांना बनावट नोटा आपल्या सोबत बाळगून असल्याचे खात्रीला सूत्रांतर्फे माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे धुळे तालुका पोलिसांनी सापळा रचून सदर संशयीताला ताब्यात घेतले असता त्याकडे १०० आणि ५०० च्या बनावट नोटा मिळून एकूण २२,२०० रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत.
संजय काका, काळजी घे! आदित्य ठाकरेंची संजय राऊतांसाठी खास भावूक पोस्ट; नेमकं काय लिहिलं?संशयित आरोपी हा विदर्भातील असल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले असल्याने मोठे रॅकेट यामागे सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या कारवाईमुळे धुळे शहरासह जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ही घटना उघड झाल्याने प्रशासनही सतर्क झालं आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Flood Relief Help Scam : अकोल्यात शेतकऱ्यांची थट्टा! मदत म्हणून ३ ते २१ रुपयांचा चेक, ‘साम टीव्ही’च्या बातमीनंतर सरकारला जागनिवडणुकी दरम्यान मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर सर्हासपणे केला जातो. मतदान होण्याच्या दोन दिवसांपासून नोटांच्या बॅगा भरून मतदारसंघात दिले जातात. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवेळी देखील असे अनेक प्रकरण समोर आली होती. त्यानंतर देखील बनावट नोटा छापा प्रकरणाचे प्रकरण समोर आले. पुढील वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. तत्पूर्वी राज्यात अनेक शहरांमध्ये नोटा छापण्याचे प्रकार समोर येत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.