Solapur Marathon: सोलापूरकर धावले अन् जिंकले! होम मैदानावर पहाटेपासूनच हजारो धावपटू अन् आरोग्यप्रेमी नागरिकांची भरली जत्रा
esakal November 03, 2025 04:45 PM

Solapur Marathon: सोलापूर आणि ‘सकाळ’ हे नाते खूप जुने आहे. ‘सकाळ’तर्फे आयोजित प्रत्येक उपक्रमांना जसा प्रतिसाद असतो, तसाच प्रतिसाद १०- के रन मॅरेथॉन स्पर्धेसाठी सोलापूरकरांचा मिळाला.

रविवारची पहाट सर्वांसाठी सुखदायी होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पर्धा जिंकण्याची जिद्द होती. पहाटे पावसाचा शिडकाव झाल्याने सगळीकडे अल्हाददायक वातावरण होते. होम मैदानावर जमल्यापासून तीन, पाच व दहा किलोमीटर पूर्ण करणाऱ्यांच्या तोंडातून व्वा...जबरदस्त...एकच नंबर! असे शब्द होते.

Maharashtra Board Exam 2026: विद्यार्थ्यांनो सज्ज व्हा! महाराष्ट्र बोर्ड 10वी-12वी परीक्षा 2026 चं वेळापत्रक जाहीर, पाहा पहिला पेपर कधी?

होम मैदानावर मॅरेथॉनसाठी पहाटे पाच वाजल्यापासूनच स्पर्धक येत होते. वर्दळ जसजशी वाढत होती, तसे काही स्पर्धक वार्मअप करण्यात व्यस्त होते. तीन, पाच व दहा किलोमीटर गटात सहभागी झालेले बहुतेक स्पर्धक आपल्या गटात आपण पहिल्या तीनमध्ये कसे येऊ, याची स्टॅट्रजी आखत होते.

सकाळी ६.१० वाजता दहा किलोमीटर गटातील मॅरेथॉनला सुरवात झाली, शिट्टी वाजली, प्रमुख पाहुण्यांनी झेंडा उंचावला आणि हजारो सोलापूरकर उद्दिष्टाच्या दिशेने सुसाट धावले. त्यानंतर साडेसहा वाजता पाच आणि तीन किलोमीटरमधील स्पर्धकही धावले.

ज्येष्ठ नागरिक, महिला, शाळकरी मुले, तरूण-तरूणींसह पोलिसही स्पर्धेत सहभाग होता. विजयपूर रोडवरील हिरवीगार झाडी, पूर्ण भरलेल्या धर्मवीर संभाजी तलावाचे निसर्गरम्य वातावरण, गुलाबी थंडी, स्पर्धेच्या मार्गावर जागोगाजी वाहतूक पोलिस, सगळीकडे रस्त्यालगत हिरवीगार झाडी, वाटेत एनर्जी ड्रिंक, पाण्याची सोय, त्यामुळे धावणाऱ्यांचा उत्साह सुरवातीपासून शेवटापर्यंत ‘जैसे थे’ होता.

उतारवयातही ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर जिंकण्याची जिद्द दिसत होती. तर विजयपूर रोडवरील दहा किमी अंतरावर (निर्मिती लॉनजवळ) थांबलेले वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्रनाथ भंडारे प्रत्येकाचे स्वागत करून त्यांचा उत्साह वाढवित होते.

Egypt Tourism: आनंदाची बातमी! नोव्हेंबरमध्ये उघडणार मिस्रचे ग्रँड म्युझियम, ट्रॅव्हल प्रेमींसाठी नवीन हॉट डेस्टिनेशन सहभागी होता न आल्याची अनेकांना खंत

सकाळी ६.१० ते ७.४५ पर्यंत होम मैदान ते विजयपूर रोड, पत्रकार भवन, महावीर चौक, गुरुनानक चौक, रंगभवन, सात रस्ता अशा प्रमुख चौकांमध्ये शेकडो वाहने थांबली होती. अनेकजण रस्त्यांलगत उभारून मॅरेथॉन पहात होते. त्यातील अनेकजण मॅरेथॉनबद्दल कुतुहलाने तेथील स्वयंसेवक, वाहतूक पोलिसांना विचारत होते. त्यावेळी अनेकांनी आपल्याला सहभागी होता न आल्याची खंत व्यक्त केली. पुढील वर्षी नक्की सहभागी होऊ असेही म्हणाले.

ठळक बाबी...

- पहाटे ५.३० वाजता होम मैदानावर झुंबाच्या तालावर सहभागींचा वार्मअप.

- सकाळी ६.१० वाजता १० किमी गटातील स्पर्धकांचा जत्था धावू लागला.

- ६.३० वाजता तीन व पाच किमीसाठी हजारो सोलापूरकर धावू लागले.

- मॅरेथॉनच्या मार्गांवर वाहतूक पोलिस अन् स्वयंसेवकांकडून काटेकोर नियोजन.

- दहा व पाच किमी गटाच्या स्पर्धकांसाठी मार्गावर पाणी व एनर्जी ड्रिंगची सोय.

- ७.५० वाजता बक्षीस वितरण सुरू, मॅरेथॉनमध्ये धावलेल्यांचा पुन्हा जल्लोष.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.