गावठी कट्ट्यासह एकाला अटक
घाटकोपर, ता. ३१ (बातमीदार) : घाटकोपर पोलिसांनी गावठी कट्ट्यासह सुरेश शेजव याला वाघडवाला लेनजवळच्या पुलाखाली ताब्यात घेतले आहे. कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा सह ३७ (१) (अ), सह १३५ महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती घाटकोपर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) रेवणसिद्ध ठेंगले यांना गुप्त माहितीदाराकडून मिळाली होती. त्या ठिकाणी सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतल्यावर हा गावठी कट्टा मिळाला आहे. आरोपीने मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हत्यार बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने आणि विनापरवाना अग्निशस्र हत्यार स्वतःजवळ बाळगले म्हणून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.