अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतील हे सांगणे फार जास्त कठीण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच आदेश देत थेट अण्वस्त्र चाचण्या करण्यास सांगितले. यामुळे जगात एकच खळबळ उडाली. जे देश काही दिवसांपूर्वी जगातील अनेक देशांवर अण्वस्त्र चाचण्या न करण्यासाठी दबाव टाकत होते तेच आता थेट आदेश देऊन अण्वस्त्र चाचण्या करण्यास सांगत आहेत. संपूर्ण जग विनाशाकडे जाताना यावरून स्पष्ट दिसतंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिका पुन्हा अणुचाचणी सुरू करणार असल्याचा इशारा दिला आहे. ट्रम्प म्हणाले की, रशिया, चीन आणि उत्तर कोरिया त्यांच्या अणुकार्यक्रमांवर काम करत आहे, मग आपणच का मागे राहायचे.
सीबीएस न्यूजला नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ते याबद्दल बोलताना दिसले. ट्रम्प यांनी म्हटले की, आपल्याकडे जगाला 150 वेळा नष्ट करण्यासाठी पुरेशी अणुशक्ती आहे. रशिया आणि चीनकडे देखील मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, आपला देश एकमेंव आहे की, आपण चाचण्या करत नाहीत. अमेरिका फक्त संयम दाखवण्याचे धोरण करत आहे तर इतर देश कमकुवत समजू लागली आहेत.
मोठा दावा करत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, चीन आणि उत्तर कोरिया सतत अणुकार्यक्रम करत आहेत. सामरिक संतुलन बिघडेल म्हणून फक्त अमेरिका गप्प आहे. या मुलाखतीच्या अगोदर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला ताबडतोब अनुचाचणी सुरू करण्याचे आदेश दिले होते. रशियाने देखील अमेरिकेसोबतचा अणु चाचण्याचा करार तोडला आहे. यानंतर अमेरिका देखील अॅक्शन मोडवर आलीये.
डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त चीनच नाही तर उत्तर कोरियावरही गंभीर आरोप केला आहे. यादरम्यान बोलताना ट्रम्प म्हणाले की, आम्ही रशिया आणि चीनशी निःशस्त्रीकरणाबद्दल बोलत आहोत. मात्र, दोन्ही देश चाचण्या सातत्याने घेत आहेत. मग प्रश्न पडतो की, मग आम्हीच का मागे राहायचे? हेच नाही तर मोठा दावा करत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, उत्तर कोरिया हा दर महिन्याला चाचण्या करत आहे.