अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच अणवस्त्र चाचणीची घोषणा केली. अमेरिका अणवस्त्र चाचणीच्या परीक्षणाची प्रक्रिया तात्काळ सुरु करेल. याचवेळी ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या अणवस्त्र चाचणीच्या टेस्टिंगबद्दल मोठा खुलासा केला आहे. “पाकिस्तानचा त्या देशांमध्ये समावेश होतो, जे सक्रीयपणे अणवस्त्रांची टेस्टिंग करत आहेत. रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि पाकिस्तान सारख्या देशांच्या घडामोडी पाहता अमेरिकेने सुद्धा पुन्हा अणवस्त्र परीक्षण सुरु केलं पाहिजे” असं ट्रम्प बोलता, बोलता बोलून गेले.
CBS News च्या 60 मिनिटांच्या कार्यक्रमात ट्रम्प यांनी रविवारी इंटरव्यू दिला. “रशिया, चीन टेस्ट करतायत. पण ते या बद्दल बोलत नाहीत. आपण एक ओपन सोसायटी आहोत, आपण या बद्दल बोलतो, कारण आपल्याकडे प्रेस स्वतंत्र आहे” असं ट्रम्प म्हणाले. “आम्ही टेस्ट करणार, कारण ते करत आहेत. उत्तर कोरियाची टेस्टिंग सुरु आहे. पाकिस्तान सुद्धा टेस्ट करतोय” असं ट्रम्प म्हणाले. रशियाच्या नव्या अणवस्त्रांच्या चाचणीनंतर पुन्हा 30 वर्षांनी अमेरिकेच्या अणवस्त्र परीक्षणाच्या निर्णयाबद्दल विचारण्यात आलं, त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं.
अमेरिकेची चाचणीची तयारी पूर्ण
“रशियाने घोषणा केलीय की ते परीक्षण करणार. उत्तर कोरिया सतत टेस्ट करतोय. अन्य देशही मागे नाहीत. फक्त आपणच टेस्ट करत नाहीय. आपण अणवस्त्रांची चाचणी न करणारा देश बनून राहू नये” असं ट्रम्प म्हणाले. “अमेरिकेकडे जगातील सर्वाधिक अणवस्त्र आहेत असा दावा ट्रम्प यांनी केला. आमच्याकडे इतकी अणवस्त्र आहेत की, आम्ही जगाला 150 वेळा नष्ट करु शकतो. रशियाचे व्लादीमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत अणवस्त्रांच्या निशस्त्रीकरणाबद्दल चर्चा केली आहे” असं ते म्हणाले. अमेरिकेने अणवस्त्रांच्या टेस्टिंगची पूर्ण तयारी केली आहे. त्यांनी वेळ आणि स्थान सांगितलं नाही.
पाकिस्तानला अणवस्त्राची खूप खुमखुमी
जगात पुन्हा एकदा अणवस्त्रांची स्पर्धा वाढू लागली आहे. भारताकडे सुद्धा अणवस्त्र आहेत. पण भारताची भूमिका ही शांततेची आहे. त्यामुळे भारत या मुद्यावर सहसा मतप्रदर्शन करत नाही. पण शेजारच्या पाकिस्तानला अणवस्त्राची खूप खुमखुमी आहे. ते चाचण्या सुद्धा करतायत. हे ट्रम्प यांच्या खुलाशामुळे स्पष्ट झालय.