Akola Accident: मलकापूर हादरले दोन अपघातांनी! भरधाव वाहनांच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
esakal November 03, 2025 03:45 AM

मलकापूर : शहरातील बुलढाणा रोडवर व निंबारी फाट्यानजीक झालेल्या वेगवेगळ्या दोन अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा रोडवरील टेन्ट हाऊस समोर ता. २९ ऑक्टोबर रोजी रात्री अज्ञात वाहनाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीस्वार अविनाश मुरलीधर इंगळे (वय ४५, रा. यशोधाम कॉलनी मलकापूर) यांना धडक दिली.

यामध्ये गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रफुल्ल मुरलीधर इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहना विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या घटनेत निंबारी फाट्यानजीक असलेल्या बुलढाणा रोडवरील सागर लॉजीस्टीक समोर अज्ञात वाहनाने दुचाकी क्र. एमएच २८ एए ८७११ ला धडक दिल्याने दुचाकीवरील गौरव ओंकार नेमाडे (२२) रा.मोरखेड ता.मलकापूर याचा मृत्यू झाला तर ऋषिकेश सोळंके हा गंभीर जखमी झाला आहे.

Maharashtra Crime : ती असुरक्षितच; साताऱ्यामध्ये महिला डॉक्टरने संपवली जीवनयात्रा, मुंबईमध्ये प्रेयसीला मारत प्रियकराने जीवन संपविले

सदर जखमी रूग्णाला उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र सदर अपघातग्रस्त तरूणाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास उपचारार्थ जळगाव खांदेश येथे रेफर करण्यात आले आहे. याप्रकरणी ऋषिकेश नेमाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.