Womens World Cup 2025 : टीममधून काढलं, वडिलांना आला हार्ट अटॅक, संकटामागून संकटाने शेफाली कोलमडली अन् अचानक एका कॉलने बदललं नशीब
Tv9 Marathi November 04, 2025 06:45 AM

Womens World Cup 2025 : असं म्हणतात ना वेळेच्या आधी आणि नशिबात जे आहे त्याच्यापेक्षा काही कमी आणि काही जास्त मिळत नाही… त्यासठी फक्त आणि फक्त मेहनत आणि चिकाटीची गरज असते… असं काही रविवारी झालेल्या एकदिवसीय विश्वचषक 2025 सामन्यात दिसून आलं… भारतीय महिला क्रिकेट संघाची दमदार खेळाडू शेफाली वर्मा हिच्यासोबत… रविवारी भारताला जे यश मिळालं आहे… त्यामध्ये या भारताच्या लेकीचा फार मोठा वाटा आहे. आता प्रत्येकाच्या तोंडावर शेफाली वर्मा हिचं नाव आहे. पण विक्रम रचण्यापूर्वी शेफाली हिने अनेक संकटांचा सामना केला.

शेफाली कशी झाली भारतीय संघात एन्ट्री?

उपांत्य फेरीपूर्वी दुखापत झालेल्या प्रतीका रावलच्या जागी शेफाली वर्माचा विश्वचषक संघात समावेश करण्यात आला. जेव्हा प्रतीकाला दुखापत झाली तेव्हाशेफाली वर्मा देशांतर्गत टी-20 मालिकेत खेळत होती. पण अशक्य शक्य होतं… तेव्हा त्यावर विश्वास ठेवणं फार कठीण असतं… प्रतीका हिला दुखापत झाल्यानंतर शेफाली हिला एक फोन कॉल आला आणि तिची एन्ट्री फायनलमध्ये झाली…

सेमीफायनलमध्ये शेफालीने चांगली कामगिरी केली नाही, पण अंतिम फेरीत तिने बॅट आणि बॉलने दमदार खेळ करून तिच्या हृदयातील आग शांत केली. अंतिम सामन्यात, शफालीने फलंदाजी करताना 78 चेंडूत 87 धावा केल्या. या डावात तिने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. त्यानंतर तिने 7 षटकांत 36 धावा देत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

शेफाली वर्माची वीरेंद्र सेहवाग याच्यासोबत तुलना

जेव्हा शेफाली वर्माने भारतीय संघासाठी पदार्पण केले तेव्हा आक्रमक फलंदाजीमुळे शेफालीची तुलना वीरेंद्र सेहवागशी झाली. पहिल्या चेंडूपासून पॉवर शॉट्स मारण्याची क्षमता असलेल्या शफालीने काही वेळातच गोलंदाजांच्या मनात भीती निर्माण केली, परंतु तिच्या आक्रमक फलंदाजीच्या दृष्टिकोनामुळे शफालीलाही संघातून वगळण्यात आलं.

सतत वाईट प्रदर्शनामुळे 2024 मध्ये ऑस्ट्रिलियाल दौऱ्यातून शेफाली हिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आली. शेफाली हिच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता… कारण टीममधून बाहेर होण्याच्या दोन दिवसांपूर्वी तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आलेला. पण टीममधून वगळण्यात आलंय… ही गोष्ट शेफाली हिने वडिलांपासून लपवून ठेवली… पण शेफालीने माघार घेतली नाही आणि स्थानिक क्रिकेटमध्ये परतण्यासाठी कठोर परिश्रम केले. शेफालीने केवळ तिचा फॉर्म परत मिळवला नाही तर तिची तंदुरुस्तीही सुधारली, जी विश्वचषक अंतिम सामन्यात स्पष्ट झाली.

आयसीसी महिला विश्वचषकात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला. टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर 50 षटकांत 9 बाद 298 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेवर मात करत पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.