Happy Birthday Virat Kohli : उगीच 'रन मशीन' नाही म्हणत, कोहलीचे हे विराट विक्रम माहिती आहेत का?
Tv9 Marathi November 05, 2025 07:45 PM

विराट कोहली केवळ एक नाव नाही. तर एक ब्रँड आहे. त्याने क्रिकेट जीवनात मोठा पल्ला गाठला आहे. त्याची बॅट तळपली की मैदानात एकच जल्लोष होतो. त्याच्या चौकार आणि षटकारांवर प्रेक्षक मैदाना डोक्यावर घेतात. त्याच्या नावावर अनेक मोठे विक्रम नोंदवले गेले आहेत. आज 5 नोव्हेंबर रोजी विराट हा 37 वर्षांचा झाला आहे. त्याचा आज वाढदिवस आहे. त्याने क्रिकेट जगतात अनेक विराट रेकॉर्डस (Top Records of Virat Kohli) तयार केले आहे. तो जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे.

विराट कोहली के टॉप-10 रेकॉर्ड्स

1. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक (51 शतक)

विराट कोहली याने 2023 मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा 49 शतकांचा रेकॉर्ड तोडला. त्याने 51 वं शतक जोजले. सध्या या विक्रमाजवळ अजून एकही खेळाडू नाही. त्यामुळे ह रेकॉर्ड तोडणे अजूनही अशक्य आहे.

2. 10,000 धावा करणाऱ्या खेळाडूत समावेश

कोहली वनडेमध्ये 10 हजार धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे. त्याने सर्वाधिक सरासरी
(59.47) धाव काढल्या. त्याने सचिन, पोटिंग, संगकारा, जयसूर्या सारख्या दिग्गजांपेक्षा तो उजवा ठरला आहे.

3. कसोटीमध्ये भारतीय फलंदाजांपैकी सर्वाधिक दुहेरी शतक (7)

विराटने कसोटीमध्ये 7 वेळा दुहेरी शतक ठोकले आहे. भारतीय खेळाडूंमध्ये हा सर्वात मोठा विक्रम आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड सारखे धडाकेबाज फलंदाज पण 6 डबल सेंचुरीपर्यंत पोहचला नाही.

4. आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा (973 धावा)

2016 च्या आयपीएल हंगामात विराट कोहलीचे नाव गाजलेले आहे. या वर्षात त्याने 17 सामन्यांमध्ये 973 धाव करत 4 शतकं ठोकली. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक व्यक्तिगत स्कोर आहे.

5. ICC टेस्ट रेटिंग पॉइंट्स (937)

कसोटीमध्ये विराट कोहली याने 2018 मध्ये 937 रेटिंग पॉइंट्स मिळाले होते. भारतीय फलंदाजामध्ये सर्वाधिक गुण मिळवणारा तो खेळाडू ठरला.

6. परदेशात सर्वाधिक शतक (एका मालिकेत 4 शतकं)

विराट कोहलीने 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात 4 शतकं ठोकली होती. त्यानंतर 2025 मध्ये एंडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये शुभमन गिलने या विक्रमाची बरोबरी केली.

7. कसोटी मालिकेत विराटच्या नेतृत्वात विजयी मालिका (9 सीरीज)

विराट कोहली याच्या नेतृत्वात भारताने सलग 9 कसोटी सामन्यात विजयी मालिका सुरू ठेवली होती. ती खंडीत झाली नाही. रिकी पोटिंगच्या काळात असा विक्रम नोंदवला गेला होता. त्याची विराटने बरोबर केली.

8. वनडे सर्वात वेगवान 10,000 धावा

कोहलीने केवळ 205 डावांमध्ये 10,000 धावा पूर्ण केल्या. त्याने क्रिकेट जगतात मैलाचा दगड रोवला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.