Dividend Stocks : शेअरहोल्डर्सना एका शेअरवर मिळणार 90 रुपये लाभांश, रेकॉर्ड तारीख याच आठवड्यात
ET Marathi November 10, 2025 11:45 PM
मुंबई : या आठवड्यात शेअर बाजारातील अनेक कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देणार आहेत. या कंपन्याचे शेअर्स एक्स-डिव्हिडंडचा व्यवहार करतील. त्यापैकी एक कंपनी म्हणजे बायर क्रॉपसायन्स लिमिटेड. Bayer CropScience ने भागधारकांसाठी प्रति शेअर ९० रुपये लाभांश देण्याची घोषणा केली आहे. या लाभांशाची रेकॉर्ड तारीखही जाहीर केली आहे. ही तारीख याच आठवड्यात आहे.
शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत Bayer CropScience ने म्हटले की पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर ९० रुपये लाभांश दिला जाईल. कंपनीने या लाभांशासाठी १४ नोव्हेंबर ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. याचा अर्थ असा की त्या तारखेला कंपनीचे शेअर्स असलेल्या गुंतवणूकदारांना dividend मिळेल.
बायर क्रॉपसायन्स लिमिटेडने याआधीही आपल्या गुंतवणूकदारांना dividend दिला आहे. शेअर्सचा एक्स-डिव्हिडंड व्यवहार ७ ऑगस्ट रोजी झाला होता. त्यानंतर कंपनीने प्रति शेअर ३५ रुपये लाभांश दिला. कंपनीने २०२४ मध्ये दोनदा एक्स-डिव्हिडंड ट्रेडिंग केले. यावेळी पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर १२५ रुपये मिळाले. बायर क्रॉपसायन्स लिमिटेडने २००१ मध्ये पहिल्यांदा लाभांश दिला. त्यावेळी कंपनीने पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर २० रुपयांचा लाभांश वाटला.
सोमवारी बायर क्रॉपसायन्सचा शेअर्स वधारून ४,५९६.५० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तीन महिन्यांत, कंपनीच्या शेअर्सची किंमत १९ टक्क्यांनी घसरली आहे. तर गेल्या वर्षात शेअर्स ३० टक्क्यांनी घसरला आहे. शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ६७२८.३५ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांक ४२२०.०५ रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप २०,६५२ कोटी रुपये आहे.