प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांना अमेरिकेतील ओहायोमध्ये आयोजित ‘डेटन लिटरेरी पीस प्राइज समारंभात’ जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार अशा लेखकांना दिला जातो, जे आपल्या पुस्तकातून शांतता, मानवीय मूल्य आणि संवादाला प्रोत्साहन देण्याचे काम करतात. तीन वर्षांआधी न्यूयॉर्पमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सलमान रश्दी यांनी आपले पुस्तक प्रकाशित केले होते. सलमान रश्दी यांचे ‘द सॅटेनिक वर्सेज’ हे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या पुस्तकावरून 1988 मध्ये इराणचे धर्मगुरू अयातुल्ला खोमेनी यांनी रश्दी यांना ठार मारण्याचा फतवा जारी केला होता.








