'सपने सुहाने लडकपन के' या सिरियलमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रूपल त्यागी आता तिच्या आयुष्यातील एका नवीन पर्वाला सुरूवात करत आहे. रूपल लग्नाच्या बेडीत अडकली असून, तिनं प्रियकराशी लग्न केलं आहे. रूपलचा विवाह सोहळा ५ डिसेंबर रोजी कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडला. तिनं नुकतेच फोटो शेअर करून या बातमीवर शिक्कामोर्तब केला. सध्या तिची लग्नाची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
रूपलने तिच्या लग्नाचेकाही फोटो शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये तिनं ब्राइडल लूक देखील शेअर केला आहे. लाल लेहेंग्यामध्ये रूपला सुंदर आणि मोहक दिसत आहे. तिने केस सोडले. हातात लाल रंगाचा चुडा घातलेला आहे. तिनं विविध पोझमध्ये फोटो शूट करून सोशल मीडियात शेअर केले आहेत.
View this post on InstagramA post shared by Roopal Tyagi (@roopaltyagi06)
रूपलच्या लेहेंग्यावर #RoopNoom लिहिले आहे. तर, तिचा पती नोमिश भारद्वाज यांनी लग्नासाठी खास पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली आहे. रूपलने सांगितले की, 'लग्न घाईघाईत झाले. अजूनही काही विधी बाकी आहेत'. काही खास आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.
दरम्यान, नोमिशने सांगितले की, एका मित्राद्वारे रूपल आणि त्याची भेट झाली. मैत्रीचं रूपांतर काही दिवसांत प्रेमात झालं. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर लग्न केलं, अशी माहिती त्यानं दिली. नोमिश भारद्वाज हा अॅनिमेशन इंडस्ट्रीमध्ये काम करतो. तो लॉस एंजेलिसमध्ये राहतो. तर, रूपल अभिनेत्री असून, ती बिग बॉस सीझन ९ चाही भाग होती. तिनं काही मालिकांमध्ये काम केलं आहे.
View this post on Instagram