03922
मळेवाडमध्ये मुलांना रोज दूध वाटप
मळेवाड ः मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायततर्फे गावातील सहा अंगणवाडीतील मुलांना रोज दूध वाटप योजना सुरू करण्यात आली. याचा प्रारंभ सरपंच मीलन पार्सेकर यांच्या हस्ते झाला. गावातील लहान मुलांचे आरोग्य चांगले राहावे, मुले कुपोषणमुक्त व्हावीत आणि त्यांना सकस पौष्टिक आहार मिळावा, या हेतूने हे दूध वाटप करण्यात येत असल्याचे उपसरपंच हेमंत मराठे यांनी स्पष्ट केले. दूध वाटप करताना बदाम व पौष्टिक पदार्थही मुलांना दिला जातो. या उपक्रमाचा निश्चितपणे अंगणवाडीतील मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी होईल, असेही मराठे यांनी सांगितले. या दूध वाटपप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य स्नेहल मुळीक, अंगणवाडी सेविका प्रियांका पार्सेकर, मदतनीस भारती मसुरकर आदी उपस्थित होते.