Mumbai Central Railway : मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! मध्य रेल्वेवर धावणार १५ डब्यांच्या लोकल गाड्या, गर्दीचा ताण होणार कमी
Saam TV November 13, 2025 12:45 PM

मुंबईकरांसाठी मध्य रेल्वेची मोठी घोषणा

१५ डब्यांच्या लोकल गाड्यांची संख्या वाढणार

२७ स्थानकांवरील विस्तारीकरण डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणार

जलद आणि धीम्या दोन्ही मार्गांवर चालतील लांब लोकल गाड्या

मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर धावणाऱ्या १५ डब्यांच्या लोकल गाड्यांची संख्या लवकरच वाढणार आहे. यामुळे मध्य रेल्वेवरील गर्दीचा ताण कमी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे १५ डब्यांच्या लोकल गाड्या फक्त जलद मार्गांवर धावणार नसून धीम्या मार्गावर देखील धावणार आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

अहवालानुसार, २७ मध्य रेल्वे स्थानकांवरील विस्तारीकरण डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण केले जाईल. हे काम पूर्ण झाल्यामुळे अधिक डब्यांच्या गाड्या चालवणे शक्य होईल. सुरुवातीच्या टप्प्यात, सध्या १२ डब्यांसह धावणाऱ्या अंदाजे १० गाड्या १५ डब्यांमध्ये अपग्रेड केल्या जातील. त्यानंतर, ही संख्या टप्प्याटप्प्याने वाढवली जाईल.

Ajit Pawar News : धवलसिंह मोहिते पाटील अजित पवारांच्या भेटीला, राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना वेग

तथापि, या बदलाचा नेहमीच्या लोकल फेऱ्यांवर परिणाम होणार नाही. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की एमएमआरमधील ३४ स्थानकांवर सध्या विस्तारीकरण सुरू आहे त्यापैकी २७ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यामुळे १५ डब्यांच्या अधिक लोकल गाड्या चालवणे शक्य होईल आणि एका लोकल ट्रेनमध्ये अधिक प्रवासी प्रवास करू शकतील. यादीतील अतिरिक्त स्थानकांमध्ये कल्याण, खोपोली आणि कसारा यांचा समावेश आहे. यामुळे या भागातील प्रवाशांसाठी प्रवास अधिक आरामदायी होईल.

Maharashtra Politics : महानगरपालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 'हा' बडा नेता धनुष्यबाण हाती घेणार

१५ डब्यांच्या अधिक लोकल गाड्यांच्या यादीत विठ्ठलवाडी, उल्हासनगर, कर्जत, खोपोली, अंबरनाथ, आंबिवली, वाशिंद, आसनगाव, आटगाव, शेलू, बदलापूर, भिवपुरी, पळसधारी, थानशीत, मुंब्रा, कोपर, कळवा, शहाड, ठाकुर्ली, कसारा, टिटवाळा आणि इतर अनेक स्थानकांचा समावेश आहे. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये वेळापत्रक अपडेट केले जाते, परंतु यावर्षी, स्थानक विस्ताराच्या कामामुळे ते अपडेट करता आले नाही. विस्तारीकरणाचे काम पूर्ण होताच नवीन वर्षात नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.